क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलगी घरात आंघोळ करत होती, कुटुंबीय घराबाहेर असताना त्याने संधी साधली


एक विनयभंगाची घटना समोर आली आहे. एका गावात अल्पवयीन मुलगी घरात आंघोळ करत होती, त्याचवेळी तिचे कुटुंबीय घराबाहेर बसले असताना एका युवकाने संधी साधून तिचा विनयभंग केला.
शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.



मिळालेल्या माहितीनुसार, बार्देश तालुक्यातील एका गावात 12 वर्षीय मुलीचा तिच्या घरात घुसून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी 22 वर्षीय युवकाला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात आंघोळ करत होती, यावेळी कुटुंबीय घराबाहेर बसले होते. दरम्यान, या संधीचा फायदा घेऊन 22 वर्षीय युवक घरात घुसला व मुलीचा विनयभंग केला. मुलीने आरडोओरडा केल्यानंतर संशयित पसार झाला.

पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या आई- वडीलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी म्हापसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पलोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम 452, 323, 354, तसेच, 353 (क), गोवा बाल कायदा कलम 8 (2) व पोस्को कायदा कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली आहे. पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रिचा भोसले पुढील तपास करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button