ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला सुरूवात, बैठकीच्या सुरूवातीलाच मोठा निर्णय


शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला सुरूवात झाली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंना दिल्यानंतर ही कार्यकारिणीची बैठक होत आहे.
या बैठकीत महत्त्वाचे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत, तसंच राष्ट्रीय कार्यकारिणीला सर्व अधिकार देण्यात येणार आहेत. बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांची निवड मुख्य नेता म्हणून करण्यात आली त्याच्या अभिनंदनाचा प्रस्तावही सादर करण्यात येणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या संसदीय दलांच्या नेत्यांची घोषणा करण्यात येणार आहे. गजानन किर्तीकर यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली जाणार आहे, तर लोकसभा ग्रुप लीडर म्हणून राहुल शेवाळे असतील.

पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला संपूर्ण अधिकार देण्यात येणार आहेत. 1998 साली बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार कार्यकारिणी स्थापन होणार आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख म्हणून कार्यकाळ संपला आहे, त्यामुळे आता एकनाथ शिंदे पक्षप्रमुख होतात का मुख्य नेते राहतात? का एकनाथ शिंदेंसाठी वेगळं पद तयार केलं जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

निवडणूक आयोगाचा निकाल निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना देताना लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदेंकडे जास्त असल्याचं कारण दिलं, याचसोबत शिवसेनेतली घटना लोकशाहीला धरून नसल्याचंही मत नोंदवलं. 2013 साली बाळासाहेबांच्या निधनानंतर आणि मग 2018 साली शिवसेनेच्या घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली, पण याचं रेकॉर्ड निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं नसल्याचं निवडणूक आयोगाने निकालात म्हणलं आहे. शिवसेनेच्या घटनेमध्ये प्रतिनिधी सभा शिवसेना पक्षप्रमुखाची निवड करते, पण शिवसेना पक्षप्रमुख असताना उद्धव ठाकरे यांनी प्रतिनिधी सभेत नेमणुका केल्या. उद्धव ठाकरे यांनी अमर्याद अधिकार स्वत:कडे घेतले, हे लोकशाहीला धरून नसल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button