ताज्या बातम्यामराठा आरक्षणमहत्वाचेमहाराष्ट्र

मराठा समाजाला OBC तून आरक्षण देऊ नका, त्यांना वेगळं आरक्षण द्या, छगन भुजबळांची सरकारकडे मागणी


मराठा समाजाला (Maratha Reservation) वेगळं आरक्षण द्या ही आमची मागणी आहे, मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं वक्तव्य अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय.

15 दिवसात 1 कोटी 58 लाख कुटुंबाचे सर्वेक्षण म्हणजे विक्रम आहे. राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला असून आता हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावर अहवालात नेमकं काय आहे हे कळायला मार्ग नाही, आजच शुक्रे समितिने अहवाल सादर केला, त्यात काय अजून माहिती नाही. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिलीय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

जलदगतीच्या सर्वेसाठी सरकारकडून दबाव – भुजबळ

भुजबळ पुढे म्हणाले, आयोग आला तेव्हापासून एक एक सदस्य गळाले, कुलगुरू हाय कोर्ट वकील, धनगर समाजाचे नेते गळाले. न्यायमुर्ती म्हणून काम करणाऱ्यांना सरकारने काढले. खंडपीठात सुद्धा मतभेद असतात, विरोध नोंदवला जातो. त्यांना का काढले यावर चर्चा केली जात आहे. जलदगतीच्या सर्वेसाठी दबाव टाकण्यात येतोय असा आरोप भुजबळांनी पत्रकार परिषदेत केलाय. मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी आहे, ओबीसीमधून आरक्षण देऊ नका ही मागणी आहे.

‘खोट्या नोंदी घेऊन कुणबी म्हणून त्यांना दाखले दिले जात आहेत



छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रीया देताना सांगितले की, ओबीसीमध्ये केलेली घुसखोरी नको आहे. खोटी प्रमाणपत्र घेतलेल्यांनी तिथे गेलेलं बरं. आम्ही आधीपासून सांगत आहोत की, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, मात्र, त्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका असे आमचे पूर्वीपासूनचे म्हणणे आहे. सध्या खोट्या नोंदी घेऊन दाखले देण्याचे प्रकार सुरू आहेत, सोलापूरात एका घरात चक्क 86 प्रमाणपत्र देण्यात आले. अनेक मराठा समाजाच्या लोकांना, त्यांची नोंद नसताना खोट्या नोंदी घेऊन कुणबी म्हणून त्यांना दाखले दिले जात आहेत, हे धक्कादायक असल्याचे भुजबळ म्हणाले.

मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवावं की नाही हा त्यांचा प्रश्न -भुजबळ

मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांना आयोग किती समजतो हे बघितले पाहिजे. सरकारनं कुणबीकरण थांबवावं तसेच कायदा, बिल, याबाबत जरांगे यांना किती समजतं माहित नाही असं भुजबळ पत्रकार परिषदेत म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button