मा.ना.सौ.सोनाली ताई राठोड सरपंच सुभाषनगर,यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन. गरीब, रोजमजूर, व ग्रामस्थ यां रुग्णांना मोफत तपासणीचा लाभ
15 व्या वित्त आयोगा मधून, ग्रामपंचायत सुभाषनगर येथे, भव्य शिबिराचे आयोजन
मा.ना.सौ.सोनाली ताई राठोड सरपंच सुभाषनगर,यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन. गरीब, रोजमजूर, व ग्रामस्थ यां रुग्णांना मोफत तपासणीचा झाला लाभ.
आरनी : (खुशाल जाधव ) तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील सुभाषनगर ग्रामपंचायत कार्यालय येथे, शिवजयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. व सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करीत मान्यवरांनी पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. दिनांक 19 /2 /2023 रोजी, 11 ते 2 या कालावधीत 145 च्या वर रुग्णांनी घेतला लाभ.पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत समाविष्ट असलेल्या गावातील गरोदर माता, किशोरवयीन मुली, लहान मूले, नेत्र तपासणी शुगर इत्यादी विविध रुग्णावर भव्य शिबिराचे आयोजन केले. शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमान पी.आर. खिरेकर साहेब सचिव सुभाषनगर, या कार्यक्रमाचे संचालक म्हणून ग्रामपंचायत सुभाषनगर सर्वेसर्वा सौ सोनाली ताई राठोड सरपंच सुभाषनगर,हे होते. कृष्णा चव्हाण उपसरपंच,ग्रा.पंचायत सदस्य,व ग्रामपंचायत सुभाषनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील राठोड, रोहित राठोड, निर्दोष राठोड,रमेश राठोड,खुशाल जाधव यांनी उपस्थिती दर्शवीत या भव्य व दिव्य शिबिराचे संपूर्ण ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.
या भव्य आरोग्य शिबिराला मोफत तपासणी करताना डॉक्टरची संपूर्ण टीम अथक परिश्रम करीत डॉ. सरजीत बैरागी, डॉ.चेतना सुरेश भटकर, डॉ. अश्विनी राठोड,डॉक्टर ऋषिकेश भोसले यांनी मोलाचे सहकार्य करीत संपूर्ण सुभाषनगर वाशीयांना मोफत शिबिर गरीब रोजगार व गरजू रुग्णांना तपासणीच्या आधारे मेडिसिन वाटप केले.जनतेमधून समाधान व्यक्त केले.