स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर,अंबाजोगाई च्या अध्यापकांनी समूहगीत गायन स्पर्धेत विभाग स्तरावर पटकावला द्वितीय क्रमांक!
स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर,अंबाजोगाई च्या अध्यापकांनी समूहगीत गायन स्पर्धेत विभाग स्तरावर पटकावला द्वितीय क्रमांक!
अंबाजोगाई : विश्वस्त मातृ मंदिर निगडी, पुणे आयोजित राज्यस्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर, अंबाजोगाई विद्यालयाने विभाग स्तरावर (नाशिक ,मराठवाडा, खानदेश) द्वितीय क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवलेला आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विद्यार्थी समूहगीत गायन व अध्यापक समूहगीत गायन अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये राज्यातील तब्बल 100 शाळांनी सहभाग नोंदवला होता. सदरील शाळांतील समूहगीतांचे परीक्षण परीक्षकांनी प्रत्यक्ष प्रत्येक शाळेत जाऊन केले होते.
दिनांक 10 जानेवारी रोजी या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी अत्यंत उत्स्फूर्त व जोशपूर्ण समूहगीताचे सादरीकरण केले व बक्षीस रूपाने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
अध्यापक समूहगीत गायन स्पर्धेमध्ये शाळेतील अध्यापकांचा विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक आल्याबद्दल नवक्षितिज बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. संतोष दादा कुलकर्णी त्याचबरोबर नवक्षितिज बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या सन्माननीय सचिव तथा स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर अंबाजोगाईच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती स्वरूपाताई दिग्रसकर यांनी सर्व अध्यापकांना अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर या स्पर्धेत सर्व अध्यापकांना विशेष मार्गदर्शन करणाऱ्या संगीत शिक्षिका श्रीमती श्रीदेवी ताई पवार यांचेही खूप खूप अभिनंदन केले. ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाई शाखेचे प्रमुख आदरणीय प्रसाद दादा, श्री अभिजीत दादा जोंधळे, प्राणेश पोरे सर व नितीन दादा यांनीही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अतिशय प्रेरक मार्गदर्शन केले. काल दिनांक 16 फेब्रुवारी रोजी विश्वस्त मातृ मंदिर निगडी पुणे येथे पारितोषिक वितरणाचा हा सोहोळा अतिशय आनंदात पार पडला . शाळेचे व सर्व सहभागी शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.