5.3 C
New York
Tuesday, December 5, 2023

Buy now

जेष्ठ संघाच्या माध्यमातून प्रत्येक गावात विविध योजना मोहीम राबविणार -जे.डी मामडगे

spot_img

जेष्ठ संघाच्या माध्यमातून प्रत्येक गावात विविध योजना मोहीम राबविणार -जे.डी मामडगे अध्यक्ष,बीड जे.ना.संघ समिती
————-
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात १९जेष्ठ नागरिक संघाची स्थापना… इतर गावांनीही सहभाग घ्यावा– डॉ.मधुकर हंबर्डे,महादेव डाडर,सुभाष गरगडे,रगनाथ जगताप,यांची संकल्पना..!
—————-
आष्टी : आष्टी येथे जेष्ठ नागरिक सेवा संघ व बीड जिल्हा जेष्ठ नागरिक समन्वय समितीने संयुक्त मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यास वरील तालुका पंचक्रोशीतून महिला व पुरुष जेष्ठ नागरिक मोठे संख्येने हजर होते.या मेळाव्यास द मराठवाडा विभागीय अध्यक्ष डॉ.बी.आर पाटील,उपा.डॉ थोरात,सचिव प्रभु कापसे,पांडुरंग लाड यांनी मार्गदर्शन केले.सदर मेळावा यशस्वी करणे साठी आष्टी सेवा संघाचे महादेव डाडर व जिल्हा संघ अध्यक्ष जे डी मामडगे यांनी उचित नियोजन व प्रयत्न करून वरील तालुक्यातील ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिक यांना पाचरण करून महिलांचे आठ व पुरुषांचे आकरा असे एकूण एकोणीस नवे संघ नोंदणी चे काम पूर्ण केले.या बैठकीतील तीस संघांसाठी नागरिक यांनी जे ना संघ स्थापित करणेची हमी दर्षवली तथा त्यातील खडकत,सांगवी,बळेवाडी,जो.पारगाव,वाळूज,टाकळसिंग, चिखली,वेताळवाडी,कोहीनी, आष्टी,कडा या प्रत्येक गावात महिला जेष्ठ नागरिक संघ व पुरूष जेष्ठ नागरिक संघ असे आतापर्यंत प्रत्येक गावात दोन संघ स्थापन झाले अशी १९ संघाची स्थापना झाली.आणि यांनी प्रस्ताव देऊन फी भरणा केली.अजूनही इतर गावांनीही आष्टी या तालुक्यातील सहभाग नोंदविला पाहिजे अशी संकल्पना डॉ.मधुकर हंबर्डे,समाजसेवक महादेव डाडर,सुभाष गरगडे,रंगनाथ जगताप,सुम्बरे,चांगदेव वाल्हेकर असे यांनी सांगितले यावेळी सुमित भालेराव,विजय जेवे, गिज्ञादेव वनवे,आश्रू महाराज मोकाशे,चांगदेव घोडके,प्रदिप वैष्णव राममंदिर पुजारी, उपसरपंच वाळुंज,नवनाथ वाघ सरपंच चिखली,राजेंद्र भोसले बळेवाडी,मा.कलबाई पालवे उपसरपंच वेताळवाडी,गांगर्डे गुरूजी,दौलत जोगदंड,मारूती कुमकर,बाबासाहेब पवार,हौसराव वाल्हेकर,महादेव शिंदे,आत्माराम खेडकर,रंगनाथ काकडे,रघुनाथ भालेराव,चहावाले किसन राऊत,महाराष्ट्र ज्युस सेंटर चे आयास पठाण,जेष्ठ नागरिक व पत्रकार अण्णासाहेब साबळे यांचे जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला.तसेच यांनी मोलाचे सहकार्य केले.प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक व संयोजकांनी मेळावा यशस्वी करण्यास सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles