नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्टेशनजवळ अपघातात 4 गँगमन ठार
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्टेशनजवळ अपघातात 4 गँगमन ठार झाले आहे. र जण 1 गंभीर जखमी आहे. ओव्हरहेड वायर तपासणी टॉवर वॅगनने रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या या गँगमनना धडक दिली असल्याचे समोर आले आहे.
पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात घडला. ठार झाले सर्व कामगार गँगमन होते. टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. पोल नंबर 15 ते 17 मधी ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान ओव्हर हेड वायर तपासणी टॉवरचे इन्चार्ज आणि चालकाला 4 Gangmen लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी मृत कर्मचाऱ्यांचे सहकारी आणि नातेवाईक आक्रमक झाले होते. मृतकांमध्ये संतोष भाऊराव केदारे (38 ), दिनेश सहादु दराडे (35), कृष्णा आत्मराम अहिरे (40), संतोष सुखदेव शिरसाठ (38) यांचा समावेश आहे.