कृषी विभागामार्फत शिरवाडे वाकद येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य 2023 वर्ष साजरे करण्यात आले
कृषी विभागामार्फत शिरवाडे वाकद येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य 2023 वर्ष साजरे करण्यात आले
निफाड : संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष आनंदाची बाब आणि अभिमानाची बाब की देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे भारत हा जगातील सर्वात मोठा पोष्टिक तृणधान्य उत्पादक देश आहे हा उपक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी भारतीय शेतकऱ्यांच्या खांद्यावर आहे या निमित्त महाराष्ट्रामधील नागरिका ंमध्ये पौष्टिक तृण धान्याबद्दल जागरूकता वाढवणे तृण धान्य उत्पादन अधिकाधिक वाढवणे याबाबत प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम न राहता जन चळवळ बनली पाहिजे यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. एक भाग म्हणून शिरवाडे वाकद येथे हा जनजागृती मोहीम जिल्हा परिषद शाळा तसेच जनता विद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्या सहभागाने साजरा करण्यात आला. कृषी विभागाचे श्री आर एन साठे यांनी कार्यक्रमाची संकल्पना तसेच
मोहिमेचा उद्देश सर्वांना सांगितला विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी सांगितले की आहारात तृणधान्य चे सेवन केल्याने आपण विविध आजारांपासून लांब राहू आठवड्यातून 2 वेळेस आपल्या कुटुंबासोबत धान्याचे सेवन करेल अशी सर्वांकडून शपथ म्हणून घेतली. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी तृणधान्याचे उत्पादन घेण्यासाठीविविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सरपंच डॉक्टर श्रीकांत आवारे यांनी सर्वांना तृणधान्याचे आहारातील महत्त्व तृणधान्ये हे सुपर फूड कसे आहे हे समजून सांगितले. शेतकऱ्यांनी त्यांच्या मुख्य पिकाबरोबर तृणधान्याची आंतरपीक घेतले पाहिजे म्हणजे कुटुंबाला तरी याचे उत्पन्न मिळेल आणि आहारात तृणधान्य येईल असे सांगितले.कार्यक्रमाचे नियोजन जनता विद्यालयाचे शिक्षक तासकर सर कवडे सर घोटेकर सर तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक साळवे सर अडे सर यांनी केले.