निलेश माझिरे यांच्या पत्नीची विषप्राशन करुन आत्महत्या
पुणे : मनसेला रामराम ठोकत काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केलेल्या निलेश माझिरे यांच्या पत्नीनं विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. माझिरे हे बाळासाहेबांची शिवसेनेचे माथाडी जिल्हाध्यक्ष आहेत. निलेश माझिरे यांच्या पत्नीनं कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शिंदे गटाचे नेते निलेश माझिरे यांच्या पत्नींन विषप्राशन केल्यानं त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांच्या पत्नीनं कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
माझिरे यांच्या पत्नीनं विषप्राशन करत आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पुढईल तपास पोलीस करत आहे.
मनसेचे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून निलेश माझिरे ओळख होती. पण काही दिवसांपूर्वीच माझिरे यांनी पक्षातील कुरघोडीला कंटाळून मनसेला रामराम ठोकला होता. त्यांच्यावर माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदावरुन तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आल्यानंतर माझिरे प्रचंड नाराज झाले होते. यातच त्यांनी मनसेचा राजीनामा देत ४०० कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.