ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

Video : ना बँड, बाजा, वरात… थेट हॉस्पिटलच्या बेडवरच लग्न झालं


एक अनोखा विवाहसोहळा पार पडला. मंदिरात लग्न होताना पाहिलं असेल, कोर्टात लग्न होताना पाहिलं असेल, पंचायतीत लग्न होताना तुम्ही पाहिलं असेल, पण आता हॉस्पिटलमध्ये बेडवर लग्न झाल्याची अजब घटना आता समोर आली आहे.अरवल जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. जिथे हॉस्पिटलच्या बेडवर तरुण आणि तरुणीचं लग्न झालं.

 

एकमेकांना हार घातले. या अनोख्या लग्नसमारंभात हॉस्पिटलमधील कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते. एवढेच नाही तर हॉस्पिटलमधील रुग्णांनी आनंद साजरा केला. या अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीरज कुमार असं तरुणाचं नाव असून हा दौलतपूरची रहिवासी असलेली त्याची मैत्रीण कौशल्या कुमारीला बाइकवरून बैदराबाद बाजारात फिरायला घेऊन गेला होता.

कार आणि बाईकची त्यावेळी जोरदार धडक झाली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले, त्यानंतर दोघांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर मुलीचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मुलगा आणि मुलीची स्थिती पाहता प्रथम दोघांवर उपचार करण्यात आले. नंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

तरुण-तरुणी एकमेकांवर प्रेम करायचे आणि घरच्यांना न सांगता गुपचूप भेटायचे. दोघेही बुधवारी सायंकाळी उशीरा बाईकवरून घरी परतत असताना अचानक कार आणि बाईकची धडक झाली ज्यात दोघे जखमी झाले. उपचारादरम्यान दोघांच्या कुटुंबीयांना प्रेमकहाणी कळली. मुलीच्या नातेवाईकांनी मुलावर दबाव आणला, त्यानंतर नातेवाईकांनी दोघांचेही रुग्णालयातच लग्न लावून दिले. एका वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button