आदर्श शिक्षक, केंद्रप्रमुख तथा केंद्र मुख्याध्यापक उमाकांत राजेश्वर स्वामी यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न..
- नागापूर चे भूमिपुत्र स्वामी उमाकांत राजेश्वर यांनी आपल्या सेवेची 37 वर्ष पूर्ण केल्यामुळे त्यांचा सहकुटुंब सत्कार परळी तालुक्याचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
सन 1986 मध्य आपले डी. एड. चे शिक्षण पूर्ण करत उमाकांत राजेश्वर स्वामी सर 13 नोव्हेंबर 1986 मध्ये जिल्हा परिषद मध्ये सहशिक्षक पदावर रुजू झाले.त्यांचा शासकीय सेवेचा प्रवास सर्वात प्रथम कौठळी येथून सुरू होऊन नंतर अस्वलअंबा, मांडेखेल, वानटाकळी, नागपिंप्री असा झाला.त्यांनी नागपिंप्री येथील केंद्रप्रमुख तसेच केंद्रमुख्याध्यापक या दोन्ही पदाचा कार्यभार कोणतेही गालबोट न लागता पूर्ण केला.आपली सर्व जबाबदारी पूर्ण करत ते सेवेची 37 वर्ष पूर्ण करत 31 जानेवारी 2023 रोजी सेवा निवृत्त होत आहेत. यानिमित्त त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन त्यांच्या मूळ गावी नागापूर येथे करण्यात आले होते. सर्व प्रथम जाधव मॅडम यांनी स्वागत गीताने सर्व उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी, स्वामी सरांनी आपल्या सेवेची 37 वर्ष इमाने-इतबारे पूर्ण केली असे प्रतिपादन गट विकास अधिकारी संजय केंद्रे यांनी केले. स्वामी सरांनी कधीही आपल्या अधिकाराचा गैरवापर केला नाही. कोणत्याही शिक्षकाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली. सेवेत असे पर्यंत सर्व टपाल कामामध्ये नागपिंप्री केंद्राचा परळी तालुक्यात प्रथम क्रमांक ठेवण्यात यश मिळवले. कर्तव्यात कुठलीही कसूर ठेवली नाही. केंद्रातील सर्व शिक्षकांचे पालकत्व समजून सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारची वागणूक दिली. न भूतो न भविष्यती केंद्रप्रमुख तथा केंद्र मुख्याध्यापक अशा प्रकारचे काम सेवेत केले आहे. परळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सोनवणे साहेब यांनी तसेच व्यासपीठावरील विविध मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.आपले मनोगत व्यक्त करताना स्वामी सरांनी आपल्या सेवेतील विविध आठवणींना उजाळा दिला. सर्वांच्या सहकार्याने मी माझी सेवा पूर्ण करू शकलो असे त्यांनी बोलून दाखवले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागापुर गावचे प्रथम नागरिक सरपंच मंगलताई तोंडारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन परळी तालुक्याचे गट विकास अधिकारी संजय केंद्रे साहेब, गटशिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे साहेब, मुंबई पोलिस अधिकारी सोपान भागवत वाडकर साहेब, परळी पोलिस स्टेशन चे अधिकारी संजय कुमटवार साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी हिना अन्सारी मॅडम, केंद्रप्रमुख यादव पल्लेवाड साहेब, कुंडलिक आप्पा सोळंके, उपसरपंच संतोष भैय्या सोळंके, ग्रामपंचायत सदस्य दीपक बापू सोळंके, पतसंस्थेचे अध्यक्ष शाम सातपुते, शिक्षक नेते वैजनाथ तांबडे, नागपिंप्री केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षण प्रेमी नागरिक, नागापूर गावातील नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी सूत्र संचालन राडकर सरांनी केले तर आभारप्रदर्शन रिजवान शेख सरांनी केले. कार्यक्रमानंतर स्वामी सरांकडून सर्व उपस्थितांना स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. सर्वानी त्याचा आस्वाद घेतला. स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.