ताज्या बातम्या

सापावर गोळ्या झाडल्या पण…; पुढच्याच क्षणी त्या व्यक्तीचाच खेळ खल्लास; खतरनाक VIDEO


धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर येत असतात. यातील अनेक व्हिडिओ इतके क्युट असातत की ते पाहूनच यूजर्सचा दिवस चांगला जातो.काही व्हिडिओ असेही असतात ज्यामध्ये या प्राण्यांशी माणसांचं वागणं अत्यंत घृणास्पद असल्याचं दिसतं. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस कोब्राला दोनदा शूट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होतात आणि वन्यजीव प्रेमींसाठी हे व्हिडिओ एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नसतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून यूजर्सनीही संताप व्यक्त केला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक माणूस लांबून सापाला लक्ष्य करतो आणि त्याच्यावर गोळीबार करू लागतो. मग साप चिडतो आणि बदला घेण्यासाठी वेगाने माणसावर हल्ला करतो.

मायक्रो-ब्लॉगिंग साइट Twitter वर “इन्स्टंट कर्मा” नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे “कोब्राशी लढण्यासाठी बंदूक आणू नका.” हा व्हिडिओ ऑनलाइन अपलोड झाल्यानंतर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोक तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर करत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर येताच त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. एका ट्विटर युजरने लिहिलं की, “तो एक निर्लज्ज आणि निर्दयी माणूस आहे.. जो एका निष्पाप, मुक्या प्राण्याला मारत आहे.” दुसर्‍या वापरकर्त्याने माणसाच्या कृतीची खिल्ली उडवली आणि लिहिलं, “मानव प्राणी या ग्रहावरील सर्वात वाईट प्रजाती आहेत.. ते शांततेत जगू शकत नाहीत.”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button