ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेसंपादकीय

कोण आहे माईंड रीड करणारी सुहानी शाह,वयाच्या ७व्या वर्षी पहिला शो…


सुहानी तिच्या माइंड रिडिंगला चमत्कार वगैरे न म्हणता ही एक कला आणि मनोविज्ञान असल्याचं सांगते. सुहानीची माइंडकेअर नावाची संस्था असून ती मानसिक थेरपीसुद्धा देते.

बागेश्वर नाथ धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सध्या देशभरात चर्चेत आहेत. धीरेंद्र शास्त्रींना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या आव्हानानंतर सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा केल्या जात आहेत. त्यातच सुहानी शाह हिचं नावही घेतलं जात आहे.

सुहानी शाह ही माइंड रिडर आहे. सोशल मीडियावर ती चित्रपट कलाकार आणि दिग्गजांसोबत याआधी दिसली आहे. तसंच सध्या अनेक चॅनेल्सवरही ती माइंड रिड करताना दिसते.

सुहानी शाह ही माइंड रिडर आहे. सोशल मीडियावर ती चित्रपट कलाकार आणि दिग्गजांसोबत याआधी दिसली आहे. तसंच सध्या अनेक चॅनेल्सवरही ती माइंड रिड करताना दिसते.

बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्रींवरुन वाद सुरू असताना एक तरुणी चर्चेत आली आहे. ही तरुणी एक जादूगार, माईंड रीडर म्हणून प्रसिद्ध आहे. ती अनेक बड्या सेलिब्रिटींसह शो करताना दिसते.

बागेश्वर धामचे पंडीत धीरेंद्र शास्त्री सध्या चांगलेच चर्चेत आहेत. लोकांच्या मनातील गोष्ट ओळखणाऱ्या मध्य प्रदेशातील बागेश्वर धाममध्ये देश तसंच जगभरातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढतेच आहे. धीरेंद्र शास्त्रींची चर्चा असताना आता ३२ वर्षीय सुहानी शाह चर्चेत आली आहे. धीरेंद्र शास्त्रींप्रमाणेच सुहानी शाहदेखील लोकांच्या मनातील गोष्ट ओळखत असल्याचा दावा तिने केला असून ती स्वत:ला माईंड रीडर असल्याचं सांगते.

कोण आहे सुहानी शाह?

२९ जानेवारी १९९० मध्ये सुहानीचा राजस्थानमधील उदयपूरमध्ये जन्म झाला. सुहानी स्वत:ला माईंड रीडरसह कॉर्पोरेट ट्रेनर, लाइफ कोच आणि हिप्नोथेरेपिस्ट असल्याचं म्हणते. तिने माईंड रिडिंगवर पाच पुस्तकंही लिहिली आहेत. सुहानीच्या वडिलांचं नाव चंद्रकांत शाह असून ते फिटनेट ट्रेनर आहेत

वयाच्या सातव्या वर्षापासून करते मॅजिक शो

‘जादू परी’ म्हणून ओळखली जाणारी सुहानी २५ वर्षांपासून मॅजिक शो करते आहे. तिने २२ ऑक्टोबर १९९७ रोजी अहमदाबादमध्ये पहिला शो केला होता. त्यावेळी ती सात वर्षांची होती. ऑल इंडिया मॅजिक असोसिएशनने तिला ‘जादू परी’ अशी उपाधी दिली आहे. तिने जगभरात अनेक ठिकाणी मॅजिक शो केले आहेत. त्याशिवाय ती माईंड रिडरचं ट्रेनिंगही देते. तिने सर्वात आधी तिच्या वडिलांकडून माईंड रीड करणं शिकली असल्याचं सांगितलं.

सुहानी शाहने यूट्यूबर संदीप महेश्वरी यांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगतिलं, की तिने इयत्ता पहिलीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे. पहिलीनंतर तिने शाळेत जाणं बंद केलं. त्यानंतर लहानपणापासूनच तिने आपलं पॅशन फॉलो केलं आहे.

सुहानी सोशल मीडियावर अतिशय अॅक्टिव्ह आहे. तिने २१ ऑक्टोबर २००७ रोजी तिचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. तिचे सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर १० लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने आतापर्यंत जाकिर खान, करीना कपूर, सायना नेहवाल, संदीप महेश्वरी अशा अनेक पॉप्युलर सेलिब्रिटींसह शो केले आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button