बीड ‘तुला आयुष्यभर सांभाळतो,म्हणत विवाहितेवर ५ वर्ष अत्याचार
बीड : बीडच्या पिंपळनेर ठाणे हद्दीत ‘तुला आयुष्यभर सांभाळतो, तुझ्या मुलांचेही संगोपन करतो’ असे सांगून एका विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली
पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर पंडित लांडे (रा. घाटसावळी, ता. बीड) असं आरोपीचं नाव आहे.
आरोपही परमेश्वर लांडे हा अविवाहित असून त्याची गावात रोपवाटिका आहे. तिथं कामाला येणारा 26 वर्षीय विवाहितेशी त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यातून 2018 पासून त्याने तिच्यावर अत्याचार केला.
‘तुला एक एकर जमीन देतो, तुझ्यासह तीन मुलांनाही सांभाळतो’, असे सांगून त्याने कुकर्म केले. पीडितेनं जेव्हा त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने नकार दिला. एवढंच नाहीतर जमीन देण्यास आणि सांभाळ करण्यास सुद्धा नकार दिला. त्यामुळे संतपलेल्या पीडितेने पिंपळनेर पोलिस ठाणे गाठून सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव यांच्याकडे कैफियत मांडली.
तिच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे. आरोपी परमेश्वर लांडेविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.