भाऊ कामाला गेल्यावर वहिनीच्या खोलीत शिरायचा दीर; नवऱ्याला कळताच…
प्रेम – प्रकरणात कोण कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही. काहीजण प्रेमात अक्षरश: वेडे होतात आणि मोठा गुन्हा करून बसतात.
असाच काहीसा एक प्रकार राजस्थानमधून समोर आला आहे. सीकर जिल्ह्यातील एका विहीरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मृत व्यक्तीच्या पत्नीसह एका व्यक्तीला अटक केली आहे.
मुकेश असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो मजूर असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजे 16 जानेवारीला मुकेशचा मृतदेह पोलिसांना एका विहीरीत आढळून आला होता. त्याची हत्या (Crime News) झाली असावी, असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी 24 तासांत तपासाची चक्रे फिरवत मुकेशच्या पत्नीला आणि त्याच्या चुलत भावाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुकेश याचे 10 वर्षापूर्वी लग्न झाले होते. संसार सुखात चालला असताना, अचानक त्याची पत्नी त्याच्यासोबत वेगळी वागू लागली. तिला मुकेशचा राग यायचा ती त्याच्याकडे व्यवस्थित लक्षही देत नव्हती. त्यामुळे पत्नीला झालं तरी काय असा प्रश्न मुकेशच्या मनात होता.
दरम्यान, एकेदिवशी मुकेश हा कामावरून लवकर घरी परतला. तेव्हा त्याने आपल्या पत्नीला चुलतभावासोबत शारीरिक संबंध (Relationship) ठेवताना बघितलं. या प्रकारानंतर मुकेश खूपच संतापला. त्याने पत्नीला मारहाण केली. तसेच चुलत भावाला सुद्धा शिवीगाळ करत घराबाहेर काढलं.
वास्ताविक मुकेशच्या पत्नीचे त्याच्या चुलतभावासोबत कित्येक वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
काही दिवसांनी मुकेश हा गायब झाला. त्याच्या मित्रांनी पत्नीला विचारणा केली असता, ते कामानिमित्त बाहेर गेले आहेत, अशी माहिती तिने दिली. दरम्यान, 8 दिवसानंतर मुकेशचा मृतदेह एका विहीरीत आढळून आला. तेव्हा मुकेशची हत्या झाली असावी, असा संशय त्याच्या जवळच्या मित्रांनी पोलिसांकडे व्यक्त केला.
दरम्यान, पोलिसांनी मुकेशच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता, दीराच्या मदतीने आपणच आपल्या पतीची हत्या करून मृतदेह विहीरीत फेकला असल्याची कबुली तिने पोलिसांकडे दिली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिचा दीर रणजित याला अटक केली आहे. अनैतिक संबधाला अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.