समाजकंटकांकडून श्री निळकंठेश्वर महादेव मंदिरावरील भोंगे काढून सहित्याची नासधूस !
- बीड येथील मोमीनपुरा या मुसलमानबहुल भागातील घटना
- पेठबीड पोलिसांकडून प्रथम दुर्लक्ष आणि नंतर अदखलपात्र गुन्हा नोंदवून हिंदूंच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार !
- समाजकंटकांनी मंदिरावरील काढलेले भोंगे
बीड : समाजकंटकांनी येथील मोमीनपुरा भागातील श्री निळकंठेश्वर महादेव मंदिरातील भोंगे काढून खाली फेकून साहित्याची नासधूस केल्याची घटना ३० डिसेंबर २०२२ या दिवशी घडली होती. याविषयी पेठबीड पोलीस ठाण्यात तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. ३ जानेवारी २०२३ या दिवशी पुन्हा श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिल्यानंतर पोलिसांकडून अज्ञाताविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवून हिंदूंच्या तोंडाला पाने पुसण्यात आली.
समाजकंटकांनी मंदिर परिसरातील फोडलेल्या लाद्या
श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३० डिसेंबर या दिवशी मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील खोलीतील साहित्याची नासधूस करण्यात आली होती, तसेच लादी फोडण्यात आली होती. श्री निळकंठेश्वर मंदिर हे मोमीनपुरा भागात असून या ठिकाणी अधिक प्रमाणात मुसलमान समाज रहातो. या भागातील काही समाजकंटक मंदिराच्या परिसरात जुगार खेळणे, धुम्रपान करणे आदी प्रकार करतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी.
- या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन आवाज उठवणे आवश्यक आहे !
- अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची विटंबना झाली असती, तर पोलिसांची अशीच भूमिका घेतली असती का ?
वरील छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी ही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. – संपादक
संपादकीय भूमिका