शारीरिक संबंधानंतर नर माशी मादा माशीला करते बेशुद्ध,पुढे ऐकूनबसेल धक्का.
तुम्हाला माशांचं वागणं ऐकून धक्का बसेल, पण शारिरीक संबंध ठेवून झाल्यानंतर नर माशी ही मादा माशीला बेशद्ध करते. हो, हे थोडं विचित्र वाटत असलं तरी देखील खरं आहे.आता हा प्रश्न मनात आपोआपच उद्भवणार की असं का? तर यामागचं कारण आहे की त्यांनी दुसऱ्या नर मादीसोबत संबंध ठेवू नये म्हणून.
आता या गोष्टी सविस्तर आणि विज्ञानाच्या दृष्टीनं पाहू जेव्हा नर माशी आपल्या जोडीदाराशी संबंध ठेवते तेव्हा मादी माशीच्या शरीरात असे रसायन सोडते, ज्यामुळे ती झोपेत जाते आणि इतर कोणत्याही नर माशीशी संबंध ठेवू शकत नाही. ही नर माशीची रणनीती असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अर्जेंटिनाचे बॅरिलोचे अणु केंद्र आणि फंडासीओन इन्स्टिट्यूटो लेलोइर यांनी वेबकॅम वापरून माशांच्या रिप्रोडक्शन सिस्टीमचा अभ्यास केला. संशोधनात असे दिसून आले आहे की, नातेसंबंध निर्माण करताना नर माशी मादीच्या शरीरात शुक्राणूंसोबत पेप्टाइड सोडते.
असे केल्याने मादी माश्या इतर नरांसाठी कमी आकर्षक बनतात. याशिवाय मादी माशीच्या जैविक यंत्रणेवरही त्याचा परिणाम होतो. यापूर्वीच्या संशोधनात असे समोर आले होते की, या माश्या सूर्य उगवण्यापूर्वीच जागे होतात. हीच वेळ आहे जेव्हा माशी शारिरीक संबंध ठेवतात.
पण पेप्टाइडमुळे माशांना सकाळ झाली असल्याचे लक्षात येत नाही आणि त्या झोपेतच राहतात. तसेच ही तिच वेळ आहे जेव्हा नर माशी सर्वात जास्त सक्रिय असतात. ज्यामुळे मादी माशा कोणत्याही नरच्या संपर्कात येत नाहीत. शास्त्रज्ञ लोरेना फ्रँको आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे की हे संशोधन नर माशांवर केंद्रित होते.
संशोधनात अनेकदा महिलांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे त्यांनी वेबकॅमद्वारे मादी माशींवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला आणि 4 दिवस त्यांच्यावर नजर ठेवली. प्रयोगशाळेत मागच्या काही दिवसात संभोग झालेली मादी आणि कुमारी माशांचे निरीक्षण करण्यात आले. तुलना करण्यासाठी नर माशांवर सामूहिक अभ्यास करण्यात आला. संशोधकांना असे आढळून आले की सकाळी उठलेल्या माश्या या संभोग न झालेल्या किंवा कुमारी होत्या, तर ज्या माश्या सूर्यप्रकाश पडेपर्यंत झोपल्या होत्या. याचे कारण पेप्टाइड असू शकते असा संशय संशोधकांनी व्यक्त केला.