नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं निधन

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं.
दोन दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अहमदाबाद इथल्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. आज पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आईच्या अंत्यदर्शनासाठी गुजरातेत दाखल होत आहेत.

शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है।
दुःखातून बाहेर पडण्याचं बळ मिळो; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी ह्यांना मातृवियोग झाला. आईचं मायेचं छत्र गमावणं ह्या इतकं मोठं दुःख असूच शकत नाही. ह्या दुःखातून बाहेर पडण्याचं बळ मोदीजींना ईश्वराने देवो हीच प्रार्थना. मोदीजींच्या आईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.
आईचे छत्र हरपणे या सारखे अनाथपण नाही; संजय राऊतांनी व्यक्त केला शोक

आईचे छत्र हरपणे या सारखे अनाथपण नाही.आई जाण्याचे दुःख मोठे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आई हिराबेन यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबीयावर आघात झाला आहे.ईश्वर मातोश्री हीराबेन यांच्या आत्म्यास शांती देवो. मोदी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

आईचे छत्र हरपणे या सारखे अनाथपण नाही.आई जाण्याचे दुःख मोठे आहे.पंतप्रधान @narendramodi जी यांच्या आई हिराबेन यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबीयावर आघात झाला आहे.ईश्वर मातोश्री हीराबेन यांच्या आत्म्यास शांती देवो. मोदी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. @PMOIndia pic.twitter.com/6qAk1EpzLq

— Sanjay Raut (@rautsanjay61) December 30, 2022
कठीण समयी मोदींना बळ मिळो; राहुल गांधींची प्रार्थना

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणतात, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिरा बा यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. या कठीण समयी मी त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराबद्दल संवेदना आणि त्यांना प्रेम व्यक्त करतो.”