राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संभाजीनगर येथे बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमानजनक एकेरी उल्लेख केला होता. तसेच महात्मा जोतिबा फुले यांचाही जाणीवपूर्वक अवमानजनक बोलून अवमान केला.
राज्यपाल हे घटनात्मक पद असून ते मनाने बोलत नसून, त्यांना कोणी तरी स्क्रीप्ट लिहून देत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या अस्मितेला धक्का बसला असून, त्यांची हकालपट्टी करावी म्हणून मराठा क्रांती मोर्चाने आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 7 डिसेंबरला ‘जालना जिल्हा बंद’चे आयोजन केले आहे.