२० वर्षीय विधवा महिलेने चार वृद्ध प्रियकरांसोबत अनैतिक संबंध

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पाटणा – बिहारमधील नालंदा येथून प्रेमप्रकरण आणि अनैतिक संबंधांचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. नालंदा येथे एका वृद्धाला या प्रेमप्रकरणाची किंमत जीव गमावून मोजावी लागली आहे.
एका २० वर्षीय विधवा महिलेने चार वृद्ध प्रियकरांसोबत मिळून पाचव्या प्रियकराची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी जेव्हा या प्रकरणात या कथित प्रेमिकेला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा या प्रकरणाचा भांडाफोड झाला. तसेच त्याबाबत ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.

हा धक्कादायक प्रकार अस्थावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलवापूर गावामध्ये घडला आहे. इथे एक ३० वर्षीय विधवा महिला चहाचं दुकान चालवते. तिचे चार वृद्धांसोबत अनैतिक संबंध होते. यादरम्यान, या प्रेमकहाणीमध्ये तृपित शर्मा (७०) या पाचव्या वृद्धाची एंट्री झाली. त्यानंतर जे काही घडते ते धक्कादायक होते. या तृपित शर्माने इतर वृद्धांप्रमाणेच या महिलेकडे प्रेमसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

या प्रकारामुळे या महिलेचे आधीचे कथित प्रियकर नाराज झाले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या सर्वांनी सदर महिलेसोबत मिळून पाचव्या प्रियकराची हत्या करण्याची योजना आखली. या महिलेने चार जणांसोबत मिळून शर्मा याला १९ ऑक्टोबर रोजी एका निर्मनुष्य भागात बोलावले. त्यानंतर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. तसेच त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीमध्ये फेकला. तसेच मृताची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने विद्रुप करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच मृताच्या मुलाने पोलिसांमध्ये तक्रार दिली.

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यामध्ये मृत नेहमी चहाच्या टपरीवर नेहमी बसायचा. अशी माहिती समोर आली. मृताचा मोबाईल स्वीच ऑफ येत होता. मात्र महिनाभरानंतर मोबाईल स्वीच ऑन करताच तो आधीच सर्विलान्सवर टाकलेला असल्याने त्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी हा मोबाईल संशयित महिलेकडून जप्त केला. तसेच तिची कसून चौकशी केली. त्यामध्ये तिने आपण चार वृद्धांसोबत मिळून या व्यक्तीची हत्या केल्याचे मान्य केले.