ताज्या बातम्या

जिवाणू खतांचा विविध खतांसोबत ‘अशा’ पद्धतीने करा वापर होईल भरपूर फायदा आणि उत्पादन मिळेल भरघोस


पिकांपासून भरघोस उत्पादन मिळावे यासाठी विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर शेतकरी बंधू करतात. परंतु रासायनिक खतांसोबत विविध प्रकारचे सेंद्रिय खते आणि जिवाणू खतांचा वापर हा खूप महत्त्वपूर्ण ठरतो.जर आपण जिवाणू खतांचा विचार केला तर ती महाग नसतात व वापरण्याला देखील सोपे व कमी वेळेत चांगला रिझल्ट देतात. जर आपण जिवाणू खतांचा विचार केला तर ते एक लो कॉस्ट टेक्नॉलॉजी असल्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये उत्पादनामध्ये 30% पर्यंत वाढ होणे शक्य आहे. त्यामुळे या लेखांमध्ये जिवाणू खतांचा वापर करण्याच्या पद्धती व त्याचे फायदे जाणून घेणार आहोत
जिवाणू खतांचा वापर अशा पद्धतीने करतात
1- जिवाणू खते बियाण्याला लावून- या प्रकारामध्ये पाकिटातील जीवाणू संवर्धक पुरेशा पाण्यात मिसळून बियाण्याला हळुवारपणे लावावे लागते. लावताना सर्व बियाण्यावर सारख्या प्रमाणात लेप बसेल व बियांचा पृष्ठभाग खराब होणार नाही अशा प्रकारे दक्षता घेऊन ते लावणे गरजेचे आहेत. ज्या बियाण्याला जिवाणू खत लावलेले आहे असे बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर किंवा किलतानावर सुकवणे गरजेचे असून सुकल्यानंतर ताबडतोब त्याचा वापर करणे गरजेचे आहे.

2- जिवाणू खतांचा रोपांना लावून वापर- विविध पिकांच्या रोपांची लागवड करताना एक बादली पाण्यामध्ये जिवाणू संवर्धक व्यवस्थित मिसळून ते मिश्रण चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यावे व रोपांची मुळे या मिश्रणात बुडवून लागवड करणे फायद्याचे ठरते. या पद्धतीने तुम्हाला मिरची, वांगी तसेच टोमॅटो सारख्या भाजीपाला पिकांच्या रोपांची लागवड करता येते.
3- जिवाणू खते शेतात टाकून वापर- जर तुम्हाला बियाण्याला किंवा रोपांना जिवाणू खतांची प्रक्रिया करणे शक्य झाले नाही तर तुम्ही पिशवीतील जिवाणू खत शेतातील अंदाजे 20 ते 25 किलो बारीक मातीमध्ये मिसळून पिकामध्ये हाताने टाकू शकतात. नंतर खुरप्याने जमीन व्यवस्थित खरडवून संबंधित पिकाला पाणी देणे गरजेचे असते.

वापर करताना जिवाणू खतांचे प्रमाण किती ठेवावे?
जिवाणू खते वापरताना दहा ते पंधरा किलो बियाण्यासाठी एक पाकीट वापरणे गरजेचे असून किंवा रोपाला चोळायचे असल्यास एकरी दोन पाकीट वापरावे लागतात. जिवाणू खतांचा वापर केल्यामुळे बियाण्याची उगवण खूप वेगाने होते व उगवणीत रोपांची मर न होता उगवण जास्त प्रमाणात होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पिकांना नत्र उपलब्ध झाल्यामुळे रोपांची वाढ जोमदार होते.
तसेच जिवाणूंनी जमिनीत सोडलेल्या बुरशीरोधक द्रव्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे रासायनिक नत्राची मात्रा 15 ते 20 टक्क्यांनी कमी लागते व त्यामध्ये बचत होते व पिकांचे उत्पन्न दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत वाढते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिवाणू खतांच्या वापरामुळे पिकाची वाढ तर होतेच परंतु जमिनीची घडण देखील सुधारते

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button