शेळीपालन व्यवसायामध्ये नशीब आजमावायचे असेल तर हे नक्की करा !
आपण शेतीला जोडधंद्याच्या बाबतीत विचार केला तर पशुपालन व्यवसायाच्या नंतर हा शेळी पालन व्यवसायाचा क्रमांक लागतो. जर आपण या व्यवसायाची जमेची बाजू पाहिली तर कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी जागेत जास्तीत जास्त आर्थिक नफा देण्याची क्षमता या व्यवसायात आहे.
त्यामुळे आताचे नवयुवक कृषी क्षेत्रामध्ये नशीब आजमावण्यासाठी पाऊल ठेवत असताना जास्त करून जोडधंद्यांपैकी शेळी पालन व्यवसायाला प्राधान्य देताना दिसत आहेत. परंतु या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शेळी पालन व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी शेळीच्या उत्तम आणि जातिवंत प्रजातींची निवड करणे देखील तितकेच गरजेचे असते
जेणेकरून येणाऱ्या कालखंडामध्ये दर्जेदार जातींच्या शेळ्या पासून मिळणारे उत्पादन देखील भरपूर मिळेल व नफा देखील चांगला राहील. त्या दृष्टिकोनातून एकंदरीत भारतात आणि महाराष्ट्रात असलेल्या एकूण शेळीच्या जातींचा विचार केला तर त्यामधून चांगल्या जातिवंत जातींची निवड करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण शेळ्यांच्या दोन महत्त्वपूर्ण जातींची थोडक्यात माहिती घेणार आहोत.
शेळीपालनासाठी उपयुक्त आहेत शेळ्यांच्या या दोन जाती
1- भाखरवाली शेळी- जर आपण शेळीच्या या प्रजातीचा विचार केला तर ही जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. या जातीच्या शेळीचा रंग हा पांढरा आणि काळा अशा दोन्ही प्रकारचा असतो व शिंगे ही खालच्या दिशेने वाकलेले असतात. भाखरवाली शेळी ही प्रामुख्याने दुधाच्या आणि मांस उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर पाळली जाते.
आपण शेळीच्या या जातीच्या दूध देण्याच्या क्षमतेचा विचार केला तर प्रति दिवस सरासरी 900 मिली दूध देण्याची क्षमता या शेळीमध्ये आहे. या जातीच्या मादी शेळीचे वजन 50 किलो असते व नराचे वजन जवळपास 60 किलो पर्यंत भरते. शेळी पालन व्यवसायमध्ये या शेळीचे पालन केले तर भरपूर नफा मिळणे शक्य आहे.
2- नंदीदुर्गा शेळी- नंदीदुर्गा शेळी ही प्रामुख्याने कर्नाटक राज्यांमध्ये प्रामुख्याने दिसून येते. या जातीच्या शेळीचा चेहरा तसेच तिच्या पायाचे खूर आणि डोळ्यांच्या पापण्या काळ्या रंगाच्या असतात. या शेळीचे पालन प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी केली जाते. तसेच हे जास्त प्रमाणात जुळ्या करडांना जन्म देतात. त्यामुळे शेतकरी बंधूंना दुप्पट नफा मिळतो. या प्रजातीच्या मादी शेळीचे वजन 25 ते 42 किलोच्या दरम्यान असते व नराचे वजन 56 किलोपर्यंत भरते. त्यामुळे या प्रजातीपासून मिळणारे मांस उत्पादन साहजिकच जास्त प्रमाणात मिळते
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या