साहेब मला वाचवा माझी बायको मला गरम चिमट्याने मारहाण करते पतीची पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पती-पत्नीच्या भांडणाचे अनेक रंजक किस्से समोर येत असतात, मात्र उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हमीरपूर जिल्ह्यातून एक अनोखी आणि रंजक घटना समोर आली आहे.
ज्याची सर्वत्र चांगलीच चर्चा सुरु आहे. एक व्यक्ती रडत रडत कोतवाली रथ पोलीस स्टेशनला पोहोचली. जिथे त्याने पोलिसांकडे (Police) साहेब मला वाचवा माझी बायको मला गरम चिमट्याने मारहाण करते अशी विनंती केली आहे
पीडिते पतीने पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कार विकण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. रथ नगरातील पठाणपुरा भागात राहणाऱ्या एका पतीने आपल्या पत्नीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पतीने म्हंटले आहे की, त्याच्याकडे एक कार असून त्याच्या पत्नीला ती गाडी विकून तिच्या पालकांना ते पैसे पाठवायचे आहेत. त्याने गाडी विकण्यास नकार दिल्यावर पत्नीने त्याला गरम चिमट्याने बेदम मारहाण केली.

अनेक दिवसांपासून पत्नी आणि पत्नीमध्ये वाद सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दोघांमध्ये अनेकदा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडण होत असते. पीडितेने रडत रडत पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी त्याचा खूप छळ करत असे. मला या संकटातून बाहेर काढा अशी विनंती त्याने पोलिसांना केली आहे. पीडितेच्या पतीने रथ कोतवाली येथे घडलेल्या घटनेची लेखी तहरीर दिली असून आरोपी पत्नीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलीस निरीक्षक राजेश कमल यांनी सांगितले की, पीडित तरुणाच्या तक्रारीच्या आधारे कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. पीडितेच्या पत्नीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल. सध्या या संपूर्ण घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा

लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या