ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात


मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील प्रवासी मोठ्याप्रमाणावर जखमी झाल्याची माहिती आहे.
ट्रक आणि बसची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. अपघातानंतर तिथले स्थानिक, हायवेवरून जाणारे प्रवासी आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीपासून 40 किमीच्या अंतरावर हा अपघात झाला आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, त्यामुळे हा ट्रक डिव्हायडर तोडून मुंबई लेनमध्ये आला. मध्ये असलेल्या स्क्रॅप विखुरला गेला आणि स्क्रॅपचे तुकडे बसमध्ये मारले गेले. बस पूर्णपणे भरलेली होती, यातल्या 15 प्रवाशांना दुखापत झाली आहे. यापैकी 2 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ट्रक नंबर MH-40- BG- 3457 चा चालक नावेद खान हा पुण्याहून मुंबईकडे जात होता, तेव्हा ट्रकचा ब्रेक फेल झाला. हा ट्रक मुंबई लेनवरून पुणे लेनवर गेला आणि बस नंबर KA-41-D-1471ला जाऊन आपटला, ज्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात नागपूरचा राहणारा ट्रक चालक नावेद खान आणि बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले

हे ही वाचा

लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या 

 

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button