क्राईममहत्वाचेमहाराष्ट्र

जिल्हा कारागृहात बंदीवानाने गिळला खिळा, काय आहे कारण?


जळगाव : जळगाव जिल्हा न्यायालयाने जामीन नामंजूर केले म्हणून २६ वर्षीय बंदीवानाने जिल्हा कारागृहात बॅरेक भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी सकाळी घडली.
आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन पितांबर सोनार असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या बंदीवानाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, चेतन सोनार हा २४ ऑगस्ट २०२० पासून जिल्हा कारागृह येथे भादंवि ३५४, ३७६, पोस्को अंतर्गत न्यायालयाच्या आदेशाने बंदी आहे. गुरूवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास त्याने कारागृहातील बॅरेक भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कारागृह शिपाई अरविंद म्हस्के यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच ही बाब तुरूंग अधिकारी संतोष पवार यांना कळविली. पवार यांनी बंदी चेतन सोनार याची विचारपूस केल्यावर त्याने न्यायालयाने जामीन नामंजूर केला म्हणून खिळा गिळून घेतल्याचे सांगितले. पवार यांनी लागलीच रूग्णवाहिका बोलवून बंदीवानाला जिल्हा कारागृहात उपचारार्थ नेले. एक्स-रे रिपोर्ट काढल्यावर बंदीवानाने खिळा गिळल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button