चमत्कार ! 24 दिवस ते झोपले व काहीही न खाता-पिता जिवंत राहिले कसे काय?
जगात विज्ञान-तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती करूनही काही गोष्टींचं गूढ अजूनही उकललं नाहीये. काही घटना तर्काच्या पलीकडे घडतात, तर काही गोष्टींबाबत विज्ञानाकडे उत्तरं नसतात.
अशीच एक घटना जपानमधील प्रशासकीय अधिकारी मित्सुटाका उचीकोशी यांच्याबाबत घडली. तब्बल 24 दिवस ते झोपले व काहीही न खाता-पिता जिवंत राहिले. हा एक चमत्कारच होता. त्याबद्दल संशोधनही करण्यात आलं.
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
मित्सुटाका उचीकोशी 7 ऑक्टोबर 2006 मध्ये मित्रांसोबत जपानमधील माउंट रोकोच्या ट्रेकसाठी गेले होते. ट्रेक करून येण्यासाठी केबल कार किंवा पायी अशी दोन्ही सोय होती. मात्र, 35 वर्षीय मित्सुटाका यांनी मित्रांना निरोप देत पायी परत येण्याचं ठरवलं. थोडा वेळ चालल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की ते भरकटले आहेत.
जंगलात रस्ता चुकल्यावर सामान्यपणे एखादी नदी शोधून तिच्या प्रवाहाबरोबर चालणं योग्य असतं. त्यामुळे मनुष्यवस्ती सापडण्याची शक्यता असते. मित्सुटाका यांनीही तसंच केलं. त्यांना नदीही मिळाली व त्या प्रवाहासोबत ते चालू लागले.
काही अंतर गेल्यावर त्यांचा पाय घसरला व एका दगडावर ते आदळले. यात त्यांच्या खुब्याचं हाड तुटलं. तरीही त्यांनी प्रवास करायचं निश्चित केलं. काही अंतर गेल्यावर रात्र झाली व थंडीही वाढली.
त्यावेळी त्यांच्याकडे थोडं पाणी आणि एक सॉसचं पॅकेट होतं. त्यावर रात्र काढून दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रवास सुरु केला. दुसऱ्या दिवशी ऊन वाढू लागलं, तशी त्यांना खूप झोप येऊ लागली. एका मोकळ्या मैदानात त्यांनी आराम करायचं ठरवलं आणि तिथे ते झोपले.
8 ऑक्टोबरला ते झोपले ते थेट 1 नोव्हेंबरलाच उठले. एक, दोन नाही तर तब्बल 24 दिवस ते तसेच झोपून होते. झोपेतून उठले, तेव्हा ते एका रुग्णालयात होते.
आदल्यादिवशी म्हणजे 31 ऑक्टोबरला एका हायकरला मित्सुटाका मैदानात पडलेले दिसले.
त्यांच्याकडे पाहून ते मृत असावेत, असं त्याला वाटलं, पण त्यांची हृदयक्रिया सुरू होती. त्यांच्या शरीराचं तापमान 22 अंशांपर्यंत कमी झालं होतं. त्यांचे अवयव जवळपास काहीही काम करेनासे झाले होते. मात्र तरीही मित्सुटाका जिवंत होते.
त्यामुळे त्यानं मित्सुटाका यांना रुग्णालयात आणलं. डॉक्टरांसाठीही हा आश्चर्याचा धक्का होता. तब्बल 24 दिवस काहीही न खाता-पिता, ऊन, थंडी, पावसात मित्सुटाका निपचित पडून होते. त्यांचं एक हाडही मोडलेलं होतं.
अशा अवस्थेत जिवंत राहणं केवळ अशक्य होतं. मात्र त्यामागे सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट अर्थात जगण्यासाठीची जबरदस्त इच्छाशक्ती कारणीभूत होती. त्यांचं शरीर हायबरनेशनमध्ये गेलं होतं. या अवस्थेत शरीरातील चयापचय क्रिया अतिशय मंदावते.
त्यामुळे अगदी थोड्या ऊर्जेवरही जिवंत राहता येतं. पोलर बेअर, हेजहॉग्ज म्हणजे काटेरी जंगली उंदीर यांचं शरीर विशिष्ट काळात हायबरनेशनमध्ये जातं. त्यामुळे ते दीर्घ निद्रा घेऊन मग काही काळानं जागे होतात. मात्र माणसांमध्ये मित्सुटाका यांच्या रुपानं हा प्रकार पहिल्यांदाच घडला होता.
मित्सुटाका 2 महिने रुग्णालयात होते. त्यानंतर मात्र ठणठणीत बरे झाले. या संपूर्ण घटनेबाबत मित्सुटाका यांनी ‘द गार्डियन’ला त्यांचा अनुभव सांगितला. “रस्ता चुकल्यानंतर मी एक संपूर्ण दिवस आणि एक रात्र चाललो.
मग थकल्यामुळे दुसऱ्या दिवशी ऊन आल्यावर मला झोप यायला लागली. मी एका मोकळ्या मैदानात जाऊन झोपलो. हीच माझी शेवटची आठवण होती. त्यानंतर थेट कोबे सिटी रुग्णालयातच मला जाग आली,” असं त्यांनी सांगितलं होतं.
मित्सुटाका यांच्या केसबाबत नंतर संशोधन करण्यात आलं. आजही वैद्यकीय शास्त्रज्ञांचा एक समूह याबाबत संशोधन करत आहे. हायबरनेशन अवस्थेमध्ये माणसाला कसं पाठवता येईल, याचा शोध ते घेत आहेत. या कोड्याचं उत्तर मिळालं, तर एक मोठा शोधच संशोधकांना लागेल.
मनुष्याला अंतराळात पाठवण्यासाठी याची खूप मोठी मदत होईल. त्याशिवाय रुग्णांनाही याचा फायदा होऊ शकतो. एखाद्या अवयवाचं प्रत्यारोपण करण्यासाठी दाता मिळत नसल्यास डॉक्टर रुग्णाला दाता मिळेपर्यंत हायबरनेशन अवस्थेत पाठवू शकतात. अशा प्रकारे रुग्णाचा जीव वाचू शकतो.
काही घटना आकलनापलिकडच्या असतात. त्यामागील रहस्य विज्ञानालाही उमगत नाही. जपानच्या मित्सुटाका यांची घटना यापैकीच एक म्हणावी लागेल. तब्बल 24 दिवस केवळ झोपलेल्या अवस्थेत राहूनही मित्सुटाका जिवंत राहिले. या काळात त्यांच्या जगण्याच्या उमेदीमुळे त्यांना अल्पऊर्जा वापरून जिवंत ठेवलं. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.
✍️✍️हे ही वाचा
लोकशाही न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
नवगण न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !