ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेसंपादकीय

ISRO चे रॉकेट LVM-3 आकाशाकडे झेपावल्यामुळे भारताचा ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास


हे तीन-स्टेज रॉकेट आहे, ज्यामध्ये दोन सॉलिड मोटर स्टेप्स ऑन आणि एक प्रोपोलेंट स्टेज आहे. मध्यभागी एक क्रायोजेनिक स्टेज आहे. या वजनी रूपामुळे त्याला इस्रोचा बाहुबली असेही म्हणतात. ISRO साठी हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण आहे. कारण LVM3-M2 मिशन हे ISRO ची व्यावसायिक शाखा असलेल्या NewSpace India Limited साठी पहिले समर्पित व्यावसायिक मिशन आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) ने शनिवारी रात्री 12:07 वाजता आपल्या सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले.
ISRO चे रॉकेट LVM-3 आकाशाकडे झेपावल्यामुळे भारताने ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला. या प्रक्षेपणासह, इस्रोने सर्व भारतीयांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. कारण LVM3 M2/OneWeb India1 हे मिशन पूर्णत: यशस्वी झाले. OneWeb च्या 36 रॉकेट प्रक्षेपणाच्या या मिशनसाठी, ISRO ने आपले सर्वात वजनदार रॉकेट ‘LVM-3’ म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून मध्यरात्री 12:07 वाजता प्रक्षेपित केले.

24 तासांचा काउंटडाऊन

LVM-3 पूर्वी या रॉकेटला GSLV मार्क रॉकेट म्हणूनही ओळखले जात होते. या मिशनसाठी 24 तासांचा काउंटडाऊन ठेवण्यात आला होता. या मिशनमध्ये ब्रिटिश स्टार्टअप वनवेबचे 36 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. वनवेब ही एक खाजगी उपग्रह संपर्क कंपनी आहे. इसरोने ग्लोबल कमर्शियल लॉन्च सर्विस मार्केटमध्ये आपला प्रवेश नोंदविला आहे.

8,000 किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता

इसरोचे अध्यक्ष म्हणाले, 43.5 मीटर लांब रॉकेट 8,000 किलोपर्यंतचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता असलेला हा सर्वात वजनदार उपग्रह म्हणून ओळखला जातो. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात LVM3 द्वारे 36 OneWeb उपग्रहांचा आणखी एक सेट लॉंच केला जाईल, असेही ते म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button