क्राईम

पोलिसांनी रस्त्यावरची अंत्ययात्रा का थांबवली?, पुन्हा घराकडे फिरवली . .


यवतमाळ येथील जामनकरनगरातील विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या महिलेच्या पतीसह तिच्या नातेवाईकांनी परस्पर अंत्यविधी उरकविण्याचा प्रयत्न केला.



मात्र डायल 112 वर तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी अंत्ययात्रा थांबवून पंचनामा केला. विवाहित महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालंय. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली मिश्रा (वय 28) असं मृत महिलेचं तर महेश जनार्दन मिश्रा (वय 34) असं आरोपी पतीचं नाव आहे. याबाबत रत्नकला शंकर तिवारी (वय 72, रा. वारज, ता. दारव्हा) यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्याला तक्रार दिली होती.

घरगुती कारणातून आरोपी पतीने वाद घातला. या वादातून पतीने पत्नी दिपालीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने इतर नातेवाईकांच्या मदतीने परस्पर अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न केला. दिपालीची अंत्ययात्रा जामनकरनगरातून स्मशानभूमीत जाण्यासाठी निघाली. याचवेळी डायल 112 वर संशयास्पद मृत्यूची तक्रार देण्यात आली. त्यानंतर अवधूतवाडी पोलीस जामनकरनगरच्या दिशेने रवाना झाले.

पोलिसांनी आरोपीला अटक कशी केली?

पोलिसांना बाजोरियानगरात अंत्ययात्रा दिसताच थांबवून घरी परत घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. तसेच संशयित पतीला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली. मात्र तो हृदयविकाराच्या झटक्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचं सांगत होता. रात्री उशीरा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दिपालीचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आलं. तसेच याबाबत तक्रारही दाखल झाली. त्यावरून पोलिसांनी पती महेश यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाता अधिक तपास अवधूतवाडी पोलीस करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button