क्राईमताज्या बातम्यादेश-विदेश

आईसोबत गरबा खेळत होती. तेव्हा तिच्या डोक्यातून रक्ताची चिळकांडी उडाली


इंदूर : गरबा खेळत असताना
एक धक्कादायक घटना समोर आली आहे गरबा पाहत असताना 11 वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ही चिमुरडी आईसोबत गरबा खेळत होती. तेव्हा तिच्या डोक्यातून रक्ताची चिळकांडी उडाली. यानंतर मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.या चिमुरडीचं नाव माही शिंदे असल्याचं समोर आलं आहे. माहीच्या डोक्यातून रक्ताची चिळकांडी उडाली.. ही घटना मंगळवारी रात्री साधारण 10.30 वाजता घडली. शारदा नगरमध्ये राहणारी रक्षा शिंदेने सांगितलं की, ती मुलगी माही आणि मुलगा हार्दिकला घेऊन घरापासून काही अंतरावर सुरू असलेला गरबा दाखवायला घेऊन गेली होती. माही आईच्या मांडीवर बसली होती.

काही वेळानंतर अचानक फटाका फुटल्यासारखा आवाज आला. काही कळायच्या आत माहीच्या डोक्यातून रक्ताची चिळकांडी उडाली. रक्षाने माहीत डोकं धरून तिला रुग्णालयात नेलं. येथे माहीचं सिटी स्कॅन करण्यात आलं.

ज्यात समोर आलं की, माहीच्या डोक्यात बंदूकीची गोळी लागण्याची शक्यता आहे. किराण्याचं दुकान चालवणाऱ्या संतोषने सांगितलं की, माही सहावीत शिकते. यावेळी मंडपात अनेकजणं उपस्थित होते. मात्र कोणीच गोळी चालल्याचं पाहिलं नाही.
माहीच्या डोक्याला नेमकं काय लागलं? तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सकाळपर्यंत मुलीवर उपचार सुरू होते. मात्र सकाळी 10.30 वाजता तिचा मृत्यू झाला. नवरात्र मंडळाच्या जवळपास कोणीही गोळी चालवल्याचं पाहिलं नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजदेखील चेक केला जात आहे.

या प्रकरणात तपासही सुरू आहे. अद्याप या प्रकरणात शत्रू वा भांडणाचा अँगलही समोर आलेला नाही. मात्र माहीच्या डोक्याला नेमकं काय लागलं, याबाबत काहीच माहिती कळू शकलेली नाही. ही घटना मध्य प्रदेशातून इंदूरमधून असल्याचं समोर आलं आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माही शिंदेच्या डोक्याच मेटलसारखा भाग सापडला आहे. ज्यावर कॉपर आहे. हा भाद माहीच्या डोक्यात तब्बल अडीच इंचापर्यंत आत घुसला होता. ही पिस्तुलाची गोळी असल्याचं नेमकं सांगू शकत नाही. काहींच्या मते ही रायफल बुलेटचा भाग असल्याची शक्यता आहे. पिस्तुल वा रायफलमधून गोळी चालल्यानंतर पोल वा अन्य कोणत्याही भारी वस्तूला धडक देऊन दिशा बदलते. याला रिकोचिट म्हटलं जातं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button