ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

जुळ्या बाळांना जन्म,मुलांचे वेगवेगळे बाप


मानवी शरीर आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी मानवाला हैराण करणाऱ्या असतात. कधीकधी अशा काही गोष्टी विज्ञानाच्या माध्यमातून पुढे येतात, ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते.
विशेषतः महिला गर्भवती राहणं (Pregnancy) आणि बाळाचा जन्म होणं (Childbirth) हे निसर्गाचं एक वरदान तर असतंच, मात्र या घटना अनेक नात्यांचा पुरावा ठरतात. अशा काही गोष्टी ऐकल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. अशीच एक धक्कादायक घटना पोर्तुगालमधून (Portugal) समोर आली आहे. इथे एका 19 वर्षांच्या तरुणीने जुळ्या बाळांना (Twins) जन्म दिला, पण त्यांचे वडील मात्र वेगवेगळे
पोर्तुगालमधील मिनेरिअस या छोट्याशा शहरात राहणाऱ्या तरुणीने जेव्हा जुळ्या मुलांना जन्म दिला, तेव्हा तिच्या पार्टनरने मुलांची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली. आपल्या मुलाचे वडील आपणच आहोत की नाही, याचा त्याला संशय होता. त्यामुळे त्याने आपल्या पार्टनर तरुणीकडे मुलांची डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली. त्याला तरुणीनेही मान्यता दिली आणि बाळांची डीएनए चाचणी करण्यात आली. त्यापैकी एका बाळाचा वडील हा तरुणीचा सध्याचा पार्टनर असल्याचं सिद्ध झालं. मात्र दुसऱ्या बाळाचा वडील मात्र वेगळीच व्यक्ती असल्याचा निष्कर्ष या टेस्टमधून निघाला. टेस्टचा हा निकाल पाहून बाळाच्या वडिलांना तर धक्का बसलाच, मात्र त्याच्या आईलाही धक्का बसला. आपल्या जुळ्या बाळांचे वेगवेगळे वडील असू शकतात, याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती.

दोघांसोबत संबंध

पोर्तुगालमधील या तरुणीचे एकाच वेळी दोन पुरुषांसोबत संबंध होते. दोघांसोबतही वेगवेगळ्या काळात तिचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. मात्र आपल्याला होणारी जुळी बाळं ही दोघांपैकी एकाच कुणापासून तरी राहिली असावीत, असंच तिला वाटत होतं. टेस्टचा निकाल पाहून तिला जबर धक्का बसला.

दोघांचेही चेहरे मिळतेजुळते

जुळ्या बाळांचे वडील वेगवेगळे असले तरी त्यांचे चेहरे अगदी एकमेकांशी मिळतेजुळते आहेत. बाळं आठ महिन्यांची असताना ही टेस्ट कऱण्यात आली होती आणि त्यांच्या वडिलांची ओळख पटली होती. आता ही बाळं अडीच वर्षांची झाली असून आईसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button