पोलीसाच्या घरी चोरी 10 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केले
पोलीस उपनिरीक्षक मधुकर पाटील यांचे कुटुंब ज्येष्ठागौरी सणानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांची नाईटड्युटी असल्याने ते रात्री शहरात
पेट्रोलिंग करत होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या शारदा नगर येथील निवासस्थानी चोरी केली.
अंबड : अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मधुकर पाटील यांचे कुटुंब ज्येष्ठागौरी सणामुळे बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी पोलिसाचे घर साफ केले आहे.
ही घटना सोमवारी (दि.5) सकाळी उघडकीस आली आहे. यात साडेदहा लाख रुपयांचे मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक मधुकर पाटील यांचे कुटुंब ज्येष्ठागौरी सणानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांची नाईटड्युटी असल्याने ते रात्री शहरात
पेट्रोलिंग करत होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या शारदा नगर येथील निवासस्थानी चोरी केली. रात्रपाळी करून पाटील हे सोमवारी सकाळी घरी आले असता दरवाजा उघडा दिसला. बेडरूममध्ये सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आले. चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात साडेसतरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 1 लाख 80 हजार रुपये नगदी आहे. दागिन्याची किंमत 8 लाख 75 हजार रुपये एवढी आहे. 10 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केले. अंबड शहरात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.