सुमारे 360 वर्षांपूर्वी बुडालेल्या एका जहाजातील खजिन्याचा शोध

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सुमारे 360 वर्षांपूर्वी बुडालेल्या एका जहाजातील खजिन्याचा शोध लागला असून त्यात अनेक मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत. खजिना शोधणाऱ्या पथकाला अजूनही अनेक वस्तू सापडतील अशी अपेक्षा आहे.
सुमारे 360 वर्षांपूर्वी 4 जानेवारी 1656 रोजी स्पेनचं एक जहाज क्यूबाहून सेव्हिलला जात होतं. ते जहाज बहामा बेटांजवळील लिटिल बहामा बँकजवळील एका मोठ्या खडकाला आपटलं आणि पुढच्या अर्ध्या तासात ते समुद्रात गडप झालं. त्या जहाजात खूप मोठा खजिना होता. आता त्या खजिन्याचा एक भाग सापडला आहे.

हा खजिना शोधणाऱ्या पथकाला अनेक अडचणी आल्या. या खजिन्यात लहानमोठ्या 35 लाख वस्तू होत्या. त्यातल्या फक्त आठ वस्तूंचा शोध 1990 पर्यंत लागला होता. त्यानंतर कार्ल एलन नावाच्या माणसाने त्याच्या पथकासह वॉकर्स के बेटाजवळ जुलै 2020पासून शोध सुरू केला. हे बेट उत्तर दिशेच्या बहामा बेटांजवळ आहे.

या शोधासाठी अनेक आधुनिक उपकरणं वापरण्यात आली. जिथे जहाज बुडालं होतं तिथे ढिगाऱ्याच्या खाली शोध घेण्यात आला. तेव्हा त्यात पाचू, नीलमसारखी रत्नं, तोफा, 3000 चांदीची नाणी, 25 सोन्याची नाणी, चिनी पोर्सलीन पद्धतीची भांडी, लोखंडाची साखळी, चांदीच्या तलवारीची मूठ, चार पेंडंट, धार्मिक चिन्हे, 887 ग्रॅमची सोन्याची साखळी अशा अनेक वस्तू त्यात सापडल्या आहेत.