Video : चक्रिवादळामुळे हाहाकार,डोळ्यांदेखत पूल कोसळला अन् ट्रक गेला वाहून
व्हिएतनाममध्ये यागी चक्रिवादळामुळे हाहाकार उडाला असून आतापर्यंत येथे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 60च्या वर गेली आहे. सोमवारी सकाळी झालेल्या भुस्खलनाच्या घटनेत 20 लोकांना घेऊन जाणारी एक बस काओ बांग प्रांतात पूरात वाहून गेल्याचा धाक्कादायक प्रकार घडला.
या भीषण चक्रीवादळादरम्यान आलेल्या पुरात येथील Phong Chau हा पुल देखील रेड नदीत वाहून गेला. या घटनेचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
हा व्हिडीओ एका कारच्या डॅशकॅममध्ये शूट झाला असून व्हिडीओमध्ये हा पूल काही क्षणात कोसळताना दिसत आहे. या पुलासोबत त्याच्यावर असलेली वाहने वाहून जाताना दिसत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार या कोसळलेल्या पुलावरून दोन मोटारसायकलसह 10 कार आणि एक ट्रक नदीत पडल्याचे वृत्त आहे. या अपघातानंतर तीन जणांना नदीतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र अन्य 13 जण अद्याप बेपत्ता आहेत.
व्हिडिओ पहा👇👇👇👇
पुल नदीत कोसळल्याच्या घटनेत बचावलेल्या 50 वर्षीय Pham Truong Son यांनी त्यांची आपबीती सांगितली आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, त्यांनी सांगितले की ते त्यांच्या मोटारसायकलवरून पुलावर जात होते तेव्हा अचानक त्यांना कसलातरी मोठा आवाज आला. पण त्यांना काय होतंय ते कळायच्या आधीच पूल नदीत पडला होता. त्यांनी सांगितले की, पाण्यात पडल्यानंतर तो पोहू लागला आणि स्वतःच्या बचावासाठी त्यांनी पाण्यात वाहणाऱ्या एका केळीच्या झाडाला पकडले.