पहिल्यांदाच जगासमोर आली ॲमेझॉनमध्ये राहणारी आदिवासी जमात माश्को पिरो
Isolated Amazon Tribe Mashko Piro: पहिल्यांदाच जगासमोर आली ॲमेझॉनमध्ये राहणारी आदिवासी जमात माश्को पिरो; जाणून घ्या संपर्कात न राहणारे लोक अचानक बाहेर का आले (Watch Video)
Isolated Amazon Tribe Mashko Piro: पेरूच्या ॲमेझॉन प्रदेशात असे आदिवासी लोक पाहिले गेले आहेत, ज्यांच्याशी आजपर्यंत कोणताही सामान्य माणूस संपर्क साधू शकलेला नाही. नुकतेच ॲमेझॉन जंगलामध्ये निवास करणाऱ्या माश्को पिरो समुदायाचे दुर्मिळ फोटो समोर आले आहेत.
ही जमात नेहमीच संपर्कापासून दूर राहिली आहे. आता सर्व्हायव्हल इंटरनॅशनल नावाच्या संस्थेने माश्को पिरो जमातीची दुर्मिळ छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. फोटोंमध्ये माश्को पिरो जमातीचे सदस्य नदीच्या काठावर विश्रांती घेताना दिसतात. स्थानिक स्वदेशी हक्क गट FENAMAD च्या मते, परिसरात वृक्षतोडीच्या वाढत्या क्रियाकलापांमुळे माश्को पिरो जमातीला त्यांच्या पारंपारिक राहत्या जागेतून बाहेर पडण्याची गरज निर्माण झाली असावी. माश्को पिरो अन्न आणि सुरक्षित निवारा शोधण्यासाठी शहरी वस्तीच्या जवळ जात आहेत. माश्को पिरो जमातीच्या लोकांचे हे फोटो जूनच्या उत्तरार्धात ब्राझीलच्या सीमेला लागून असलेल्या माद्रे डी डिओस या दक्षिण-पूर्व पेरुव्हियन प्रांतातील नदीच्या काठावर घेण्यात आले होते.
❗️ New & extraordinary footage released today show dozens of uncontacted Mashco Piro Indigenous people in the Peruvian Amazon, just a few miles from several logging companies.
Read the news: https://t.co/g9GrZlf3XB pic.twitter.com/fZv5rryzVp
— Survival International (@Survival) July 16, 2024
माश्को पिरो ही पेरूच्या ॲमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये राहणारी एक आदिवासी जमात आहे. ही जमात ‘असंपर्क’ राहते, म्हणजेच बाहेरील जगाशी संपर्कापासून दूर. हे लोक बाहेरच्या कोणाशीही संवाद साधत नाहीत. आता वृक्षतोड करणाऱ्या कंपन्यांच्या वाढत्या उपस्थितीमुळे हे आदिवासी त्यांच्या मूळ अधिवासापासून दूर जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडच्या काही दिवसांत मॉन्टे साल्वाडो गावाजवळ 50 हून अधिक माश्को पिरो आदिवासी दिसले.