पती तिचे अश्लील व्हिडिओ बनवून विकायचा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अलीगढ जिल्ह्यातील एका महिलेने पतीसह नऊ जणांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा तसेच इतर अनेक गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार पती तिचे अश्लील व्हिडिओ बनवून विकायचा. लग्न झाल्यापासून तो तिचा सतत छळ करत होता. तसेच इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव देखील आणत होता. दोघांच्या लग्नापूर्वी पती एका खून प्रकरणात आरोपी असल्याचेही लपवून ठेवले होते.

अलीगढमध्ये बन्नादेवी परिसरात राहणाऱ्या या महिलेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, 29 एप्रिल 2017 रोजी तिचा विवाह लोढा गावातील राहुल शर्मा याच्याशी झाला होता. लग्नापूर्वी त्याच्या कुटुंबीयांनी तो खुनी असल्याची माहिती माझ्यापासून लपवून ठेवली होती. याची शिक्षा त्याने आधीच भोगली होती. सध्या तो हायकोर्टातून जामिनावर बाहेर आहे. लग्नानंतर पती तिला रात्री बेदम मारहाण करत असे असा आरोप करण्यात आला आहे.

पतीने आपले दोन्ही हात तोडल्याचा आरोपही महिलेने केला आहे. यानंतर पती राहुलने बाहेरच्या पुरुषांना घरात आणून माझ्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यानंतर पतीच्या छळाला कंटाळून महिलेने गाव सोडले आणि आपल्या माहेरच्या घरी राहू लागली. काही दिवसांनी राहुलने तिला विवेक नावाच्या व्यक्तीशी बोलायला लावले आणि त्याने त्या महिलेला त्याच्याशी लग्न करून हॉटेलमध्ये भेटण्यास सांगितले. यावेळी महिलेने पोलिसांना माहिती देण्याची तयारी केली होती. मात्र तेव्हा विवेक आलाच नाही.

महिलेने यासंदर्भात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीने स्वत:च्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ बनवून विकले. महिलेने विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून महिला आपल्या माहेरी गेली. त्यानंतर तिच्या पतीने सासरच्या मंडळींसह तिला घटस्फोट न देता दुसरं लग्न केल्याची माहिती मिळाली. महिलेने तिचा पती राहुल तसेच विवेक, जगन्नाथ, सुनील, कमलेश, गुंजन, अजय, जगदीश आणि मनू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.