वैज्ञानिंकांनी सांगितले की या प्रकारचा प्राणी यापूर्वी कधीही समुद्रात किंवा किनाऱ्यावर पाहिलेला नाही
एका महिलेने असा दावा केला आहे की, या प्राण्यासा समुद्र किनाऱ्यावर तिने चालताना पाहिलेले होते. तिने या प्राण्याला विचित्र, राक्षसी आणि घाबरवणारा असल्याचे सांगितले आहे. निसर्ग आणि समुद्र या प्राण्याला घेऊन पुन्हा समुद्रात जाईल, असा विश्वास या महिलेला वाटत होता. मात्र आता तो प्राणी मेलेला आहे. या अजीबोगरीब प्राण्याला पाहण्यासाठी सिडनीच्या ग्रीनहिल्स बीचवर लोकांची गर्दी झाली होती. हा प्राणी यापूर्वी कधीही पाहिला नसल्याची कुजबूजची त्यांच्यात सुरु होती. या प्राण्याची रचना पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसत होता.
सिडनी : ऑस्ट्रेलियात सिडनीच्या समुद्रकिनाऱ्यावर एक रहस्यमय प्राणी दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
वेगळाच असणारा हा प्राणी समुद्र किनाऱ्यावर (beach)मृतावस्थेत सापडला आहे. समुद्र किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्यांनी या प्राण्याला सर्वात प्रथम पाहिले. मात्र कुणाचीच या प्राण्याजवळ जाण्याची हिंमतच होत नव्हती. अनेक तास उलटल्यानंतरही या प्राण्याची हाचचाल दिसत नाही, हे पाहिल्यानंतर काही जणांनी या प्राण्याच्या जवळ जाण्याचा धीर गोळा केला. या प्राण्याच्या पाठीवर समुद्री झुडपे जमा झालेली होती. या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिकांनी आणि वैज्ञानिंकांनी सांगितले की या प्रकारचा प्राणी यापूर्वी कधीही समुद्रात किंवा किनाऱ्यावर पाहिलेला नाही. हा प्राणी खोल समुद्रात राहणारा असावा, अशी शक्यताही समुद्र वैज्ञानिंकानी व्यक्त केली आहे. वेगाने येणाऱ्या लाटांसोबत हा प्राणी किनाऱ्यावर वाहत आला असावा, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.