व्हिडिओ न्युज

Video लग्नाचा मांडला बाजार; भरमांडवात नवरीला बेशुद्ध करून लावलं लग्न, पुढे जे घडलं


पूर्वीच्या आणि हल्लीच्या लग्नांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक पाहायला मिळतो. पूर्वी लग्न साध्या पद्धतीने व्यस्थित पार पडायचे. परंतु. हल्ली लग्नात अनेक नवनवीन पद्धती पाहायला मिळतात.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून, समाजमाध्यमांवर लग्नातील अनेक मजेशीर किस्से, फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. पण, आता एका लग्नातील एक विचित्र प्रकार पाहायला मिळत आहे; जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सध्या हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर खूप चर्चेत आहे.

व्हिडिओ पहा

 

काही दिवसांपूर्वी लग्नातील असेच काही विचित्र व्हिडीओ नुकतेच व्हायरल झाले होते. त्यातील एका व्हिडीओमध्ये एक नवरी चक्क अंगात भूत शिरल्याचे नाटक करताना दिसली होती. या व्हिडीओमधील तिचे हावाभाव पाहून अनेकांना घाम फुटला होता. तर, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये नवऱ्याला पाहून नवरी डान्स करताना दिसत होती. दरम्यान, आता या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरी असे काही तरी करतेय. जे पाहून तुम्हीही अवाक व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपात वर-वधू बसले असून, वर वधूच्या भांगेत कुंकू भरताना दिसत आहे; पण यावेळी वधू मात्र बेशुद्धावस्थेत दिसत आहे. सुरुवातीला अनेक जण ती झोपलेली आहे, असे म्हणत होते. पण, निरखून पाहिल्यावर वधूला बेशुद्ध करून तिच्याशी वर जबरदस्ती लग्न करीत असल्याचे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

https://www.instagram.com/reel/C6WZAA0pYai/?utm_source=ig_web_copy_link

 

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @crystal_wordz या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला आठ मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत. त्याशिवाय या व्हिडीओला एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर युजर्सदेखील अनेक कमेंट्स करीत आहेत. एकाने लिहिलेय, ‘बिचारीला बेशुद्ध करून तिच्याशी लग्न लावलं जातंय.’ दुसऱ्या एकाने लिहिलेय, ‘मला वाटतंय तिला कि़डनॅप केलंय.’ आणखी एकाने लिहिलेय, ‘झोपलेली नाही ती. तिचं जबरदस्ती लग्न लावत आहेत.’ आणखी एकाने लिहिलेय, ‘तिला सोडा; असं जबरदस्तीनं लग्न लावू नका.’


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button