ताज्या बातम्या

वीजेपासून बचाव ‘दामिनी ॲप’ काय आहे? मग ‘दामिनी ॲप’ची जनजागृती करणे आवश्यक


सतत येणारा अवकाळी पाऊस आणि पावसाळा यात वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना घडल्यानंतर लगेचच बातम्या प्रसिद्ध होऊ लागतात त्या दामिनी ॲपच्या… ‘आता वीज कुठे पडणार ते 15 मिनिटांत कळणार’, ‘वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी वापरा दामिनी ॲप’, ‘आता वीज कोसळण्यापूर्वीच मिळेल ॲलर्ट’… चार वर्ष झाली दामिनी ॲप सुरू होऊन मात्र तरीही वीज पडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

 

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार 2022 ते 2023 साली नैसर्गिक आपत्तींमुळे देशात 8,060 जणांचा मृत्यू झाला तर वीज पडून 35.8% म्हणजेच 2,887 लोकांचा मृत्यू झाला. वीज पडून संपूर्ण देशात झालेल्या मृत्यू पैकी तब्बल 29 टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी दोन हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मग वीजेपासून बचाव करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने तयार केलेल्या ‘दामिनी ॲप’चा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

‘दामिनी ॲप’ काय आहे?

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटरोलॉजी (IITM) ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारी या स्वायत्त संशोधन संस्था आहे. या संस्थेने 2020 मध्ये ‘दामिनी लाईटनिंग’ ॲप विकसित केले आहे. संस्थेने वीज प्रवण क्षेत्र अचूकरित्या शोधण्यासाठी देशभरात 83 ठिकाणी लाईटनिंग लोकेशन नेटवर्क उभारले आहेत. या नेटवर्कचा सेंट्रल प्रोसेसर हा IITM या संस्थेत आहे. हा प्रोसेसर या नेटवर्ककडून आलेले सिग्नल रिसिव्ह करतो, त्यावर प्रक्रिया करतो आणि मग 500 मीटर पेक्षा कमी अचूकतेसह वीज पडणारे ठिकाण ओळखतो. हे ॲप संपूर्ण भारतात घडणाऱ्या विजेच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. व्यक्तीच्या जीपीएस लोकेशेनद्वारे तो राहत असलेल्या ठिकाणापासून 20 ते 40 किलोमीटर अंतरावर वीज पडणार की नाही, याची पूर्वसूचना हे ॲप देतं. आता इतके महत्वाचे संशोधन जर भारताने केले असेल तर मग लोकांपर्यंत ते हा पोहचलं नाही ?

विजेपासून बचावासाठी जर हे ॲप महत्वाचं असेल तर नक्कीच शेतकऱ्यांना या ॲपचा फायदा होऊ शकतो. ह्या ॲपबद्दल दैनिकांमधून, मासिकांमधून माहिती देणं आवश्यक होतं. सर्वात महत्वाचं बघायला गेलं तर गावागावांमध्ये आता व्हाट्सअप ग्रुप तयार आहेत त्या ग्रुप वर सरपंचांच्या मार्फत ही माहिती देणं आवश्यक होतं. महाराष्ट्रात 28,349 पंचायती आहेत त्या पंचायती पर्यंत जरी ह्या ॲप बद्दल माहिती पोहोचली असती तर ते गावकऱ्यांकडे पोहोचणं शक्य झालं असतं. मीडिया मार्फत रेडिओ मार्फत या संदर्भात जनजागृती केली तर नक्कीच ह्या ॲपचा उपयोग शेतकऱ्यांना होईल.”

वीज पडणं ही आपल्या देशात नैसर्गिक आपत्ती मानली जात नाही. वीज पडून होणाऱ्‍या मृत्यूंपैकी 96 टक्के मृत्यू ग्रामीण भागात होतात. अशा स्थितीत ग्रामीण भागात अशाप्रकारच्या दामिनी ॲपची माहिती देणं गरजेचं आहे. देशात दरवर्षी वीज कोसळण्याच्या घटना सरासरी एक कोटीहून अधिक प्रमाणात घडतात, यावरुनच या समस्येची तीव्रता समजू शकते. या घटनांमध्ये साधारणत: दोन ते अडीच हजार लोकांचा मृत्यू होतो. भारताप्रमाणेच जगाचीही तीच स्थिती आहे. जगभरात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयातील प्राध्यापक तथा भूगोल, वातावरण, वन्यजीव विषयाचे अभ्यासक डॉ. योगेश दूधपचारे यांनी या अभ्यासाची माहिती दिली आहे. विज पडायची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, याचा हवामान बदला सोबत सरळ संबंध जोडला जातोय. हवामानाच्या एखाद्या गोष्टीवर नियंत्रण साधले जाऊ शकेल परंतु वीज पडण्यावर नियंत्रण अन्य अत्यंत कठीण काम आहे. वीज पडून मृत्यू मात्र गरिबांचाच जास्त होतोय. एका संशोधनातून मिळालेली आकडेवारी सांगते की 66% मृत्यू हे पुरुषांचे आणि 34% स्त्रियांचे आहेत. 62% हे वयस्क लोकांचे आणि 38% हे मुलांचे आहेत.

जर दामिनी ॲप वापरायचा असेल तर…?

दामिनी ॲप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ते डाऊनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर ‘Damini : Lightning Alert’ असे सर्च करायचे. हे ॲप डाऊनलोड केले की जीपीएस लोकेशन ऑन ठेवण्यासाठी परवानगी द्यायची आहे. त्यानंतर हे ॲप तुमचे लोकेशन शोधेल आणि तुमच्या ठिकाणापासून 40 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एक वर्तुळ काढेल. आणि मग तुमच्या भागात पुढच्या 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता आहे की नाही ते सांगेल. या प्रक्रियेसोठी थोडा वेळ लागेल. वीज पडणार नसेल, तर No Lightning Warning किंवा बिजली की चेतावनी नही, अशी सूचना तिथे दिलेली असेल. पण जर वीज पडणार असेल आणि त्या वर्तुळात लाल रंग दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या भागात पुढच्या 5 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते. वर्तुळात पिवळा रंग दिसत असेल, तर 5 ते 10 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते आणि निळा रंग असेल, तर 10 ते 15 मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असते.

दामिनी ॲपवर खबरदारीच्या सूचना

या ॲप वरील Instructions या पर्यायात तुम्ही जर वीज प्रवण क्षेत्रात असाल तर काय खबरदारी घ्यायची, याच्या सूचना दिल्या आहेत. या ॲपवरील Register या पर्यायावर क्लिक करून तुम्ही इथे नोंदणी करू शकता. नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, पिनकोड, व्यवसाय ही माहिती भरून तुम्ही या ॲप वर नोंदणी करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या भागात वीज पडण्यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते. जून-जुलैचा महिना लक्षात घेत महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनांनी दामिनी ॲप वापरण्याचं आवाहन सर्वसामान्य जनतेला केलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button