क्राईमनागपूर

वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले अन हळदीच्या दिवशी…


नागपूर : युवक आणि युवतीची फेसबुकवरून मैत्री झाली. त्यांचे सूत जुळले. युवकाने लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, नंतर त्याने लग्नास नकार दिला. यामुळे तिने आईवडिलांनी शोधलेल्या युवकासोबत लग्न करण्याचे ठरवले.मात्र, हळदीच्या दिवशीच युवकाने प्रेयसीला फोन केला आणि लग्न न करण्यासाठी धमकी दिली. तिने नकार दिल्याने तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफिती नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवल्या. त्यामुळे हळदीच्या दिवशीच तरुणीचे लग्न मोडले.

पीडित तरुणी नेहा (काल्पनिक नाव) ही पाचपावली परिसरात राहते. ती उच्चशिक्षित असून तिची फेसबुकवरून आरोपी शुभम पाटील (२७, रामटेक) याच्याशी ओळख झाली. तो नागपुरात एका कंपनीत नोकरी करतो. नेहा आणि शुभम फोनवरून एकमेकांशी बोलत होते. यादरम्यान, शुभमने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याने वाढदिवस असल्याचे सांगून केक कापण्यासाठी बोलावले. तीसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवून आली. त्याने तिला रामटेकमधील मूनलाईट हॉटेलमध्ये नेले. तेथे वाढदिवसाचा केक कापल्यानंतर तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच त्याने काही दिवसांतच लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने नेहाशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. १४ फेब्रुवारीला त्याने नेहाला पुन्हा रामटेकमधील हॉटेलमध्ये नेले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना लपून मोबाईलमध्ये छायाचित्र आणि चित्रफीत काढली. त्यानंतर तो तिला वारंवार अश्लील छायाचित्र आई-वडिलांना पाठविण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवत होता. नेहाने त्याला लग्नाचा तगादा लावला असता त्याने नकार दिला.

प्रियकराकडून लग्न तोडण्यासाठी दबाव

प्रियकर शुभमने लग्नास नकार दिल्यानंतर नेहाने आई-वडिलांनी शोधलेल्या युवकासोबत लग्न करण्याचे ठरविले. भावी पतीसोबत तिचा संवाद सुरू झाला. मात्र, पूर्वीचे प्रेमप्रकरण तिने लपवून ठेवले. दोन्हीकडे लग्नाची तयारी झाली. हळदीच्या दिवशी शुभमचा नेहाला फोन आला आणि त्याने लग्न तोडण्यासाठी दबाव टाकला. मात्र, नेहाने लग्न मोडण्यास नकार दिला. त्यामुळे प्रियकराने तिचे सर्व अश्लिल छायाचित्र आणि शारीरिक संबंधाच्या चित्रफिती नवरदेवाच्या मोबाईलवर पाठविल्या.

प्रियकराला अटक

शुभमने पाठविलेले छायाचित्र बघताच नवरदेवाच्या पायाखालची वाळू सरकली. हळदीच्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. त्याने तिला भेटायला बोलावले. तिनेही प्रेमसंबंधाची कबुली दिली. त्यामुळे त्याने २१ एप्रिलला होणारे लग्न मोडले. नेहाने थेट पाचपावली ठाणे गाठले. तिने प्रियकर शुभम पाटील विरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी हळदीच्या दिवशीच शुभमवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button