ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोदवड येथील शेतात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू


ऊंडणगाव : बोदवड (ता. सिल्लोड) येथे गुरुवारी (ता. २०) दुपारी शेतात काम करत असताना वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकरी संपत दगडुबा गव्हाणे (वय ४३) हे शेतात जनावरांचा चारा जमा करत असताना गुरुवारी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला व पावसाला सुरुवात झाली होती जनावरांचा चारा ओला होईल या भीतीने शेतकरी संपत गव्हाणे हे चारा जमा करून ठेवत होत त्याचवेळी शेतकरी गव्हाणे यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. संपत गव्हाणे सायंकाळपर्यंत घरी आले नसल्यामुळे मुलगा कार्तिक व पत्नी व सचिन पुतण्या सायंकाळी सहा सुमारास शेताकडे पाहण्यासाठी गेले असता संपत गव्हाणे हे शेतामध्ये चाऱ्याच्या गंजीजवळ मृतावस्थेत पडले असल्याचे त्यांना दिसले.



नातेवाइकांनी घटनेची माहिती अजिंठा पोलिस स्टेशन येथील बीट जमादार चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल अक्रम पठाण, पोलिस कॉन्स्टेबल शेळके यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तलाठी जयंत घोडके, सहायक भरत बोरकडे यांनीसुद्धा घटनास्थळाचा पंचनामा करून मृतांच्या नातेवाइकांना भेट दिली.

शेतकरी संपत गव्हाणे शेतामध्ये चारा जमा करत करत असताना त्यांच्याजवळ कुठलाही मोबाईल व कुठलाही वस्तू नव्हती व ते कुठल्या झाडाच्या आश्रयाजवळही नव्हते तरीसुद्धा त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. संपत गव्हाणे यांना दोन मुली, एक मुलगा, पत्नी असा परिवार असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर अस्मानी संकट कोसळले आहे.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button