ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

भररस्त्यात शिवशाहीला आग गाडीत ४२ प्रवासी…


पुणे : शास्त्रीनगर चौकात भररस्त्यात धावणाऱ्या शिवशाही बसला आग लागली. सुदैवाने या दोन्ही आगीत जीवितहानी झाली नाही.पुण्यातील अत्यंत रहदारीच्या असलेल्या शास्त्रीनगर परिसरात शिवशाही बसला आग लागली. त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली होती. यवतमाळ-औरंगाबाद-पुणे असा प्रवास करत ही बस येरवाडमधील शास्त्रीनगर येथील गलांडे हॉस्पिटलजवळ आली. तेव्हा चालकाला काहीतरी बिघाड झाल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यांनी गाडी बाजूला घेत प्रवाशांना खाली उतरवलं. प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर गाडीने पेट घेतला. चालकाच्या प्रसंगवधनामुळे तब्बल ४२ प्रवाशांचा जीव वाचला आहे. दरम्यान, ही बस सतत गरम होत होती. तरीही ती पुण्यापर्यंत आली. त्यानंतर चालकाला बिघाड झाल्याचं लक्षात येताच त्याने गाडी रिकामी केली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवशाही बसला आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शिवशाही बसेसची देखभाल दुरुस्ती चांगल्या पद्धतीने व्हावी अशी मागणी करण्यात येतेय.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button