Video व्हिडिओ पाहून उडेल थरकाप,चाकाच्या जागी गाडीला लावले धारदार ब्लेड
आजकाल मॉडीफाय करण्याचा ट्रेंड जरा जास्तच होत चाललेला आहे. आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहत असतो.
गाडी मॉडीफाय करण्यापासून त्यांनी केलेले कष्ट, तयारी या सगळ्याचा व्हिडिओ त्यानंतर ती गाडी मॉडीफाय केल्यानंतर कशी दिसते त्याचा लुक असा एक ट्रांजिशन व्हिडिओ आपण सोशल मीडियावर नेहमीच पाहत असतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.खास म्हणजे या व्हिडिओमध्ये बाईकची जी चाक आहे ती खास आकर्षण बनलेली आहे. जी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Saw Blades make better wheels than you would think
[📹 cboystv]pic.twitter.com/kaiFk8EUq8
— Massimo (@Rainmaker1973) March 12, 2024
या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गाडीची चाके ही सामान्य चाकांपेक्षा खूपच वेगळी आहे. या व्हिडिओमध्ये असणाऱ्या दुचाकीच्या चाकाच्या जागी धारदार ब्लेड बसवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे ही एका विचित्र चाकांची बाईक वेगवेगळ्या ठिकाणी रेस देखील करत आहेत. धारदार ब्लेड लावल्यामुळे याच गाडीचा स्पीड देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु ही अशी एक आगळीवेगळी चाकांची गाडी पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले आहे. ही गाडी चालवल्यावर अगदी जमिनीलाही भेगा पडताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ X वर शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्या युजरने लिहिलेले आहे की, “सो ब्लेड इतके शक्तिशाली चाके बनू शकतात याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केवळ 25 सेकंदाचा आहे, तरी या व्हिडिओला आतापर्यंत 16.5 लाख व्ह्यूज झालेले आहेत. तसेच 81000हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक युजर या व्हिडिओवर कमेंट करत आहे. अनेकांना हा व्हिडिओ तसेच ही बाईक आवडलेली आहे, तर अनेकजणांना मात्र ही बाईकला अत्यंत धोकादायक वाटत आहे.