क्राईमताज्या बातम्याबीड

ट्रकवर कंटेनर धडकून झालेल्या अपघातात चालक ठार


शहरा बाहेरून जाणाऱ्या बायपासवर मंगळवारी मध्यरात्री बंद पडलेल्या ट्रकवर कंटेनर धडकून झालेल्या अपघातात चालक ठार झाला.शेख हमीद बनेमियाॅ ( ३५, कोळेवडगावं ता. पैठण जि. औरंगाबाद ) असे मृत चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जालनाहून सोलापुरकडे सळई घेऊन जाणारा ट्रक ( एम.एच.१४ बी.जी ०८५२ ) मंगळवारी रात्री २ वाजेच्या सुमारास गेवराई बायपासवर नादुरुस्त झाल्याने बंद पडला. त्यावेळी औरंगाबादहून बीडकडे एक कंटेनर ( एम.एच.२० डी.ई.४४३३ ) याच मार्गे जात होता. अंदाज न आल्याने कंटेनर ट्रकवर पाठीमागून धडकला. यात चालक शेख हमीद बनेमियाॅ हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button