ताज्या बातम्यादेश-विदेशव्हिडिओ न्युज

Video हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना! काश्मिर खोऱ्यातील रोमांचक व्हिडिओ


छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती आहे.किल्ले शिवनेरीवर शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.



काश्मिरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली. हिमवर्षाव होत असताना सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. काश्मिर खोऱ्यात साजऱ्या झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.

व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटतोय

👇👇👇👇

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या X या सोशल मिडिया हँडलवरुन काश्मिरमधील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष… कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी #शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले, याबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. असे कॅप्शन मुख्यमंत्री शिंदे यांनी व्हिडिओ शेअर करताना दिले आहे.

व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव

मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही मीनिटांत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकजण हा व्हिडिओ रिशेअर करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज याठिकाणी मराठा बटालियनच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी सलामी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button