क्राईमताज्या बातम्यादेश-विदेश

विवाहितेवर सामूहिक बलात्कार, तिला 4 लाखांना विकल्याचा धक्कादायक ..


मिरज : पुण्याहून कराडला आई वडिलांना भेटण्यासाठी निघालेल्या विवाहित तरुणीला रेल्वेत झोप लागली. तिला कराडला उतरायचं होतं, मात्र झोप लागल्यानं मिरजेला पोहोचली पुढे काय घडल ?

लवकर गाडी नसल्याने ती रेल्वे जंगक्शनवर थांबली. त्यावेळी तिथे काही तरुणांनी तिला जबरस्तीने झुडपात ओढत नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पीडित तरुणीला रेल्वे ब्रीजजवळील कामगाराच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कोंडून ठेवलं. एका आरोपीने तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. आरोपींनी तिला कर्नाटकात जमखंडी इथे नेलं आणि तिला विकायचा प्लॅन केला.

जमखंडी इथे पुन्हा आरोपींनी तिच्यावर बलात्कार करुन तिला 4 लाखांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरोपींनी तिचे एका व्यक्तीची जबरदस्ती लग्न लावलं आणि त्या व्यक्तीकडून चार लाख रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इथे मुलगी आली नाही म्हणून घरच्यांचा जीव कासाविकस झाला. त्यांनी पोलिसांकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

ज्या व्यक्तीला आरोपींनी विकलं त्यांनी तरुणीसोबत केलेलहा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर

त्याने पुन्हा मिरजेत ख्वाजा बस्तीजवळ तिला सोडून दिले. विवाहित तरुणीने तिथून थेट पुणे गाठलं आणि पोलीस ठाण्यात न्याय मागायला गेली.

पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन सात संशयित तरुणांना अटक केली आहे. सरफू फकीर वय वर्ष 20, संतोष बाबू वय वर्ष 26, जुबेद वय वर्ष 24, खालीद कोरबू वय वर्ष वीस, महंमदहुसैन वय वर्ष 31, अबूजर जमादार वय वर्ष 18, महंमद मुल्ला वय वर्ष 20 अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी अटक करुन सातही जणांना न्यायालयात हजर केलं. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button