क्राईमदेश-विदेश

अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत महिला शिक्षिकेने ठेवले शारीरिक संबंध अन…


अमेरिकन शाळेतील एका विवाहित शिक्षकेला 14 वर्षीय विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल 50 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागणार आहे. व्हर्जिनियातील हंग्री क्रीक मिडल स्कूलमध्ये शिकवणाऱ्या 25 वर्षीय मेगन पॉलीन जॉर्डनने 14 वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचा कबुली दिली आहे.

मेगनने कबूल केले की, ती 14 वर्षीय विद्यार्थ्याच्या घरी त्याच्यासोबत सेक्स करण्यासाठी गेली होती. मेगनला दोषी ठरवल्यानंतर, हेन्रिको काउंटी कॉमनवेल्थच्या अटॉर्नी कार्यालयाने एका निवेदनात म्हटले की, मेगन जॉर्डनला एका अल्पवयीन मुलासोबत लैंगिक संभोगाच्या चार गंभीर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. तिला 50 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल.

न्यूयॉर्क पोस्टनुसार, मेगन पॉलीन जॉर्डनला एका अल्पवयीन मुलासोबत लैंगिक संभोगाच्या चार गुन्ह्यांसाठी तसेच एका अल्पवयीन व्यक्तीसोबत असभ्यतेच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले. व्हर्जिनिया कायद्यानुसार, 17 वर्षांखालील अल्पवयीन मुलाशी लैंगिक संबंध ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे. 17 वर्षांखालील अल्पवयीन व्यक्तीने लैंगिक संबंधासाठी दिलेली कोणतीही संमती कायदेशीररित्या वैध नाही.

गेल्या वर्षी जूनमध्ये अटक करण्यात आली होती

मेगन पॉलीन जॉर्डन हिला 2022-23 या वर्षात तिच्या 14 वर्षीय विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल दोषी ठरवले. अनेक प्रसंगी जॉर्डन पीडित मुलाच्या घरी जाऊन लैंगिक संबंध ठेवत असे. विद्यार्थ्याच्या पलंगावरुन तिचा डीएनए मिळाला. जो या खटल्यातील महत्त्वाचा पुरावा ठरला. जॉर्डनला जून 2023 मध्ये अल्पवयीन मुलासोबत लैंगिक संबंध आणि अश्लील कृत्य केल्याचा आरोप झाल्यानंतर अटक करण्यात आली होती. खटला सिद्ध झाल्यानंतर तिला 20 मे रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. हेन्रिको काउंटी कॉमनवेल्थचे ॲटर्नी शॅनन टेलर म्हणाले की, शिक्षिकेला (Teacher) 50 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button