क्राईमपुणे

प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेऊन पैशांसाठी ब्लॅकमेल,तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


पुणेःप्रेमसंबंधाचा (Love Affair) गैरफायदा घेऊन पैशांसाठी ब्लॅकमेल करुन मानसिक त्रास दिल्याने एका तरुणाने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली.

निलेश मसाजी बनसोडे Nilesh Massaji Bansode (वय २५, रा. किरकटवाडी, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी एका महिलेसह विकास भडकुंबे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत महावीर मसाजी बनसोडे (वय ३०, रा. तुंगत, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३/२४) दिली आहे. ही घटना किरकटवाडी येथील हॉटेल नमस्कारमधील खोलीमध्ये ३ फेब्रुवारी रोजी घडली होती. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ निलेश हा पुण्यात रहायला आला. त्याचा त्यांच्याच गावातील व सध्या किरकटवाडी येथे राहणार्‍या विवाहित महिलेशी संबंध आला. फिर्यादी यांनी निलेश याला ही बाई विवाहित असून तिचा नाद सोड असे वारंवार सांगितले होते.

त्यानेही तिला सोडून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मोबाईल नंबरही बदलला. तिचे विकी भडकुंबे याच्यासोबतही प्रेमसंबंध असल्याचे निलेशला समजले. ही महिला व विकी पैशांसाठी खूप मानसिक त्रास देत असल्याचे त्याने फिर्यादी यांना सांगितले होते. ३ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी कळविल्याने फिर्यादी किरकटवाडीला आले. पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा निलेश याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. निलेश याच्या खिशात सुसाईट नोट आढळून आली. त्या चिठ्ठीमध्ये ही महिला व विकास भडकुंबे हे मला ब्लॅकमेक करीत होते. पैसे मागत होते. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, त्या दोघांना सजा झाली पाहिजे असे लिहिले होते. निलेशवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून हवेली पोलीस तपास करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button