क्राईम

धक्कादायक घटना 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने केला बलात्कार


गुजरातच्या सुरत मध्ये लिम्बायत येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. हे कोणाला सांगितले तर तुला ठार मारेन असे धमकी दिल्यावर पुन्हा एकदा तसेच करण्याचे प्रयत्न केल्यावर तिने आईला घडलेले सांगितले.आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.



सदर घटना सुरतच्या लिम्बायत येथे दोन महिन्यांपूर्वी घडली आहे. 27 जानेवारी रोजी पीडित मुलीची आई कामावर गेली असताना आरोपी मुलगा मुलीचा घरी आला व भावाला दुसऱ्या ठिकाणी पाठवायला सांगितले मुलगी घाबरली आणि तिने आईला घडलेले सांगितले. दोन महिन्यापूर्वी आई कामाला गेली असताना आरोपी घरी आला आणि त्याने पाणी मागितले नंतर आरोपीने दार बंद करून तिच्यावर बलात्कार केले आणि कोणालाही सांगितले तर तुला आणि भावाला ठार मारेन अशी धमकी दिली. नंतर पुन्हा असे घडू नये या साठी तिने आईला सांगितले नंतर आईने पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाची पुढील चौकशी करत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button