ताज्या बातम्या

दिक्षाभूमी दर्शन सहलीचे आयोजन केल्याबद्दल आमदार संजय जगताप यांचा पालखी तळावर सत्कार


दिक्षाभूमी दर्शन सहलीचे आयोजन केल्याबद्दल आमदार संजय जगताप यांचा पालखी तळावर सत्कार



सासवड : पुरंदर तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी वैकुंठवासी दिवंगत चंदूकाका जगताप यांनी, कायम सामाजिक सलोखा राखत पुरंदर तालुक्यातील विविध जाती धर्मातील नागरीकांसाठी कावडयात्रा असेल किंवा हाज यात्रा असेल अशा धार्मिक सहलीचे आयोजन करुन तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला त्यांच्या प्रार्थना स्थळी जाऊन , दर्शन घेता यावे या करीता वेळोवेळी धार्मिक सहलीचे आयोजन करुन सर्व सामान्य नागरीकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करुन , पुण्यकर्म केले आहे, तो वारसा जपत पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार संजय जगताप यांनी , दिवंगत काकांच्या नंतर हा उपक्रम अविरतपणे चालू ठेवला आहे, नुकतेच त्यांनी बौध्द अनुयायांची धार्मिक पंढरी म्हणून जगात ओळख असलेल्या नागपूर येथील दिक्षाभूमी दर्शन सहलीचे १९ / १ / २०२४ ते २१ / १ / २०२४ रोजी असे तीन दिवसांच्या यशस्वी धार्मिक सहलीचे आयोजन केल्याबद्दल पुरंदर तालुक्याच्या वतीने, पुरंदर हवेलीचे लोकप्रतिनिधी आमदार संजय जगताप यांचा ७५ व्या प्रजासत्ताक दिनी पुरंदर तालुक्यातील सासवड येथील ऐतिहासिक पालखी तळावर शाल सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले, रिपाइं नेते, गौतम भालेराव, बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानोबा वाघमारे, भारतीय बौध्द महासभा सभेचे तालुका अध्यक्ष सुनिल जगताप, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सुहास बेंगाळे भटक्या विमुक्त संघटनेचे नेते ,मनोहर ताथवडकर बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नामदेव नेटके, बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त, बळीराम सोनवणे , पुणे जिल्हा रिपब्लिकन पारधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम पवार, सासवड नगरपरिषद पथारी संघटनेचे संचालक गुलाबराव सोनवणे, कोडीत ग्रामपंचायत सदस्य गौरव भोसले, हिवरे गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रतिक कुंभार , बौध्द विकास तरुण मंडळ सुपे खुर्दचे विश्वस्त शंकरराव जगताप, रिपाइं नेते व बेलसर गावचे सुपूत्र प्रकाश कदम, बौध्दजन सेवा संघ परिंचे या मंडळाचे विश्वस्त महेंद्र पोळ व जितेंद्र पोळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व बहूजन सामाजिक विकास प्रतिष्ठान पुणे , समस्त पुरंदर तालुका बहुजन बांधवांच्या वतीने करण्यात आले होते,


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button