देश-विदेश

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनंतर ५७ मुस्लिम देश संतप्त,बाबरी मशीद पाडून बांधलेल्या या मंदिराचा आम्ही निषेध करतो


अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सपन्न झाला. या सोहळ्याची देशभरात जोरदार चर्चा झाली. यानंतर आता ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने सोमवारी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.



इस्लामिक स्थळ बाबरी मशीद पाडून बांधलेल्या या मंदिराचा आम्ही निषेध करतो, असे ओआयसीने निवेदन जारी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी अयोध्येत राम ललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. राम मंदिरात फ्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिराच्या उद्घाटनाचा तीव्र निषेध केला, ६ डिसेंबर १९९२ भारतातील सर्वात मोठ्या न्यायालयाने किंवा या घटनेला जबाबदार असलेल्या निर्दोष ठरवले, आमि मंदिर त्याच ठिकाणी बांधण्यास मान्यता दिली, हे निषेधार्ह आहे. आता ओआयसीनेही अशीच प्रतिक्रिया दिली आहे.

ओआयसीने काय म्हटले?

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनचे सरचिटणीस हिसेन ब्राहिम ताहा यांनी म्हटले की, “ओआयसीच्या सरचिटणीसांनी भारतातील अयोध्येत आधीच बांधलेली बाबरी मशीद पाडल्यानंतर नुकत्याच बांधलेल्या राम मंदिराच्या बांधकाम आणि उद्घाटनाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. “”मागील सत्रांदरम्यान परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने, OIC जनरल सेक्रेटरीएट या पावलांचा निषेध करते. बाबरी मशिदीसारखी इस्लामिक स्थळे नष्ट करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. बाबरी मशीद गेल्या ५०० वर्षांपासून त्याच ठिकाणी उभी होती.

OIC काय आहे?

चार खंडातील ५७ देशांची ही संघटना सुमारे २ अब्ज लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते. OIC हा संयुक्त राष्ट्रांनंतर जगातील दुसरा सर्वात मोठा आंतरशासकीय गट आहे. याचे मुख्यालय सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आहे. ओआयसीवर आखाती देश सौदी अरेबिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचे वर्चस्व मानले जाते.

महात्मा फुले यांच्या जीवनपटाची अतिशय उत्तम ,सत्यशोधक चित्रपट टॅक्स फ्री करणार – छगन भुजबळ

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button